जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा!!

जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा!!
जवळे (ता.आंबेगाव) येथे शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे.यावेळी शिवशंभो प्रतिष्ठानचे सर्व सभासद निरंजन शिंदे ,पंढरी टाव्हरे, उत्तम शिंदे पाटील,अमोल शिंदे, तुषार टाव्हरे, राहुल गावडे, निलेश गायकवाड ,दत्तात्रय गायकवाड,गणेश शिंदे, स्वप्निल टाव्हरे ,गणेश टाव्हरे, दिलीप येलभोर,प्रेम गायकवाड, सहास शिंदे, यश गायकवाड या युवकांनी शिवनेरी वरून शिवज्योत आणली. या शिवज्योतीची गावातून ढोल ताशा व डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक संपन्न झाली.
यानंतर ग्रामपंचायत समोर उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते गणेश पूजन, शिवज्योत पूजन करून,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन सौ.वृषाली उत्तम शिंदे पाटील (आदर्श सरपंच जवळे) व महिला भगिनी शिवशंभो प्रतिष्ठानचे सर्व सभासद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शालन सोनवणे,सुरेखा खालकर,शैला गावडे,वैशाली वायकर,संध्या वाळुंज,शशिकला गावडे,सुनंदा शिंदे व महिला भगिनी, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
यामध्ये स्वरूप लायगुडे यांने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळेचे विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातील सर्वच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांचे शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम शिंदे पाटील यांनी केले.