आंबेगाव तालुक्यातील लोणी,धामणी येथे देशी झाडांची लागवड!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी,धामणी येथे देशी झाडांची लागवड!!
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी व धामणी या दुष्काळी गावात १४ ट्री फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून एकूण सुमारे १५० एकर माळरानावर ३० हजार देशी वृक्ष लागवड करून त्यांचे पाच वर्षापर्यंत संस्था संगोपन करणार आहे.पहिल्या टप्प्यात दोन्ही गावात प्रत्येकी पाच हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आठवड्यातून एकदा प्रत्येक झाडाला पाईपने पाणी दिले जात आहे.
१४ ट्री फाउंडेशन (वेताळे,ता.खेड) या संस्थेचे व्यवस्थापक अनंत तायडे लोणी व धामणी या दोन गावातील वृक्ष लागवड मोहिमेबद्दल माहिती देताना म्हणाले की, संस्थेच्या वतीने आम्ही खड्डे घेऊन वड,पिंपळ,चिंच, आवळा,जांभुळ,कडुलिंब आदी देशी वृक्षांची लागवड करतो.प्रत्येक झाडाला जीवामृत खते दिली जातात. टंचाईच्या काळात उंच ठिकाणी तळे करून टँकरने पाणी आणून त्यामध्ये साठवून वीज,पेट्रोल किंवा सोलर पंपाच्या साह्याने पाईपने प्रत्येक झाडाला आठवड्यातून एकदा पाणी दिले जाते. प्रत्येक झाडाला नंबर दिला आहे त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात.
एकांदे झाड मेले तर तीन वर्षापर्यंत पुन्हा त्या ठिकाणी नवीन झाडाची लागवड केली जाते.पाच वर्षापर्यत संस्था झाडांचे संगोपन करते.यासाठी स्थानिक १६ तरुणांना रोजगार मिळाला आहे.
झाडांचे जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी संपूर्ण क्षेत्राला बांबू पासून कठडे बसवले आहे.लोणीत काही ठिकाणी वीज उपलब्ध नसल्याने दोन ठिकाणी सोलर वरील पंप बसवले आहे.स्थानिक नागरिकांना निसर्गाबाबत आपुलकी निर्माण व्हावी व त्यांचा या मोहिमेत सहभाग वाढवा यासाठी उंच ठिकाणी बसण्यासाठी गवताच्या झोपड्या तयार करण्यात आल्या आहेत.
लोणी येथे माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी,शालेय विद्यार्थी,ग्रामपंचायत व धामणी येथे ग्रामपंचायत व शालेय विद्यार्थ्यांचे वृक्ष लागवड करण्यासाठी सहकार्य मिळाल्याचे श्री. तायडे यांनी सांगितले.
लोणी येथे एकूण १२५ एकरवर २५ हजार वृक्ष लावण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच हजार वृक्ष लागवड केली आहे.धामणी येथे २५ एकर वर पाच हजार वृक्ष लावण्यात आली आहे.
१४ ट्री फाउंडेशन या संस्थेच्या २५ एकर वर पाच हजार देशी वृक्ष लागवड केली आहे टंचाईच्या काळात टँकर ने पाणी आणून पाईपने प्रत्येक झाडाला पाणी दिले जाते.
स्थानिक नागरिकांना निसर्गाबाबत आपुलकी निर्माण व्हावी त्यांचा वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग वाढवा यासाठी बसण्यासाठी गवताच्या झोपड्या तयार करण्यात आल्या आहे.