आरोग्य व शिक्षणसामाजिक
शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे शिवजयंती उत्साहात संपन्न!!

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे शिवजयंती उत्साहात संपन्न!!
आज १९ फेब्रुवारी अर्थात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती!! आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमतः अंगणवाडी मध्ये महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली.महिलांच्या शुभहस्ते महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी आजी माजी सरपंच,अंगणवाडी सेविका,युवक वर्ग तसेच अंगणवाडीतील विद्यार्थी उपस्थित होते.