राजकीय

शिरूर तालुका व शिरूरच्या ३९ गावातील शेकडो महिलांचा मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश!

शिरूर तालुका व शिरूरच्या ३९ गावातील शेकडो महिलांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या रविवारी लांडेवाडी येथे झालेल्या जनता दरबारामध्ये शिरूर तालुका व शिरूरच्या ३९ गावातील शेकडो महिलांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य शासनाची ताकद आपल्या पाठीशी असून मी व्यक्तिशः शिरूर तालुक्यातील विकास कामे तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या भागातील संघटित महिलांसाठी, महिला बचत गटांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या योजना राबविल्या जातील असे यावेळी सांगितले.

कार्यक्रमास डायनालॉग इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील, बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख शिरूर रामभाऊ सासवडे, युवासेना राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, युवासेना जिल्हाधिकारी बापूसाहेब शिंदे, शिवाजीराव नवले, शरद नवले, युवराज निंबाळकर, अण्णा हजारे, वैभव ढोकले, दत्ता गिलबिले, संतोष वर्पे, गणेश कोतवाल, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख अश्विनी जाधव, तालुकाध्यक्ष रेश्मा चौधरी, कानिफ गव्हाणे, सविता करपे, सरपंच निमगाव माळुंगे मल्हारी काळे, सरपंच सोने सांगवी विजय करपे, सचिन सासवडे, सचिन वाबळे, आप्पासाहेब धुमाळ, संतोष गव्हाणे, शिरूर केसरी दादा काशीद, कृष्णा सासवडे, ग्रामपंचायत सदस्य शिक्रापूर भाऊ हरगुडे, सागर दरेकर, उप तालुकाप्रमुख अश्विनी लांडगे यांच्यासह असंख्य शिवसेना व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या सत्कार समारंभामध्ये रोहिणी राजेंद्र चव्हाण पाबळ, स्वाती सचिन पाबळे पाबळ, सपना अनिल जाधव पाबळ, शारदा दिपक कर्वे घोलपवाडी, रुपाली अभिनव गोरडे नि’गाव म्हाळुंगी, अर्चना कृष्णा सासवडे शिक्रापूर, सविता किसनराव ढोकले बजरंगवाडी- शिक्रापूर, अलका नामदेवराव घातडक बजरंगवाडी- शिक्रापूर , सीमाताई योगेश पवार सणसवाडी, सुवर्णा देवानंद ताठे केंदुर, सुधा सुरेश झेंडे सणसवाडी, विशाल रामदास घुमटकर नागरगाव, सचिन दत्तात्र खंडागळे न्हावरे, तुकाराम नामदेव डफळ धामारी, निलेश दिलीप गव्हाणे नागरगाव, नवनाथ बाळासाहेब वीर भांबर्डे, सुनिल पांडुरंग शेळके सोनेसांगवी, सत्वान सिताराम भुजबळ शिक्रापूर, भानुदास बबनराव राऊत राऊतवाडी, बाळकृष्ण विश्‍वनाथ वाघचौरे आलेगाव पागा, प्रल्हाद मारुती अवचिते आलेगाव पागा, नवनाथ लहानु थोरवे पाबळ, प्रमोद मच्छिंद्र गायकवाड आंबळे, साहिल संतोष येलभर मोटेवाडी, अशोक खुशाल ससे कोंढापुरी, किरण कैलास कड गणेगाव खालसा, किरण अंकुश गवारे कारेगाव, स्वप्निल पांडुरंग धुमाळ पिंपळे खालसा आदि पदाधिकाऱ्यांना विविध पक्षीय जबाबदाऱ्यांचे वाटप करून नियुक्तीपत्राद्वारे सन्मान करण्यात आला.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.