आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पंचनामा विशेष लेखमाला – नाते कलेचे त्या रक्ताशी!!

साभार लेख - शाहीर खंदारे

महाराष्ट्रातील बहुगुणी ,बहुज्ञानी रत्नपारखी, रसिकराज
नाते कलेचे त्या रक्ताशी या लेखमालेचे आजचे आकर्षण……….
गायिका, सुपर लावणी नृत्यांगना, वगनाट्यातील व्हिलन भुमिका करणारी व आपल्या आवाजात जादू असणारी बानुबाई चिंतामण निकम (साकरी रोड) धुळे,ता.जि.धुळे होय.

तमाशाकला तेथे तमाशा कलावंत आणि तमाशा कलावंत तेथे तमाशाकला एकमेकांच्याशिवाय दोघे जगू शकत नाहीत ,कला मिळविण्यासाठी कष्टाशिवाय त्यागाशिवाय पर्याय नाही. हे बानूबाई यांनी लहानपणापासून ओळखले होते.
बानुबाईच्या आईचे नाव मीराबाई असून वडिलांचे नाव शंकरराव कोचुरे आहे.बानुबाईला ४मुले व १मुलगी आहे.त्यांना वयाच्या ७व्या वर्षापासून कलेचा छंद लागलेला.त्या आई वडिलांबरोबर रसुलभाई पिंजारी यांच्या तमाशात जाऊन अंगात कला अवगत करू लागली. बानूबाई चांगल्याच कलानिपुण तयार झाल्या होत्या.

ताल, स्वर, लय, या त्रिवेणी संगमाचा बाज घेऊन बानुबाईने धोंडू कोंडु पाटील, रसुलभाई पिंजारी,(खांन्देशचा कोहिनूर हिरा) भिका भीमा सांगवीकर,कलाभूषण रघूवीर खेडकर,जिवा पाटील यसगावकर,हिरामण नगर देवळेकर,वंदना चाहूर वाडीकर,आनंदा आहिरे चौखेडेकर,लीलाबाई ,शांताबाई जळगावकर,इत्यादी नामवंत तमाशा फडात एक नंबरचे नाव करून,स्वत: चिंतामण निकम देवळीकर या नावाने फड तयार केला.त्याचप्रमाणे अनेक धार्मिक,पौराणिक, सामाजिक, कौंटुबिक वगनाट्यात मेन भुमिका करुन आपले नाव रसिकांच्या ओठांवर ठेवले.उदा-नाशिकेत आख्यान,बापाच्या हातुन मुलाचा खून,सत्य विजय,या मध्ये व्हिलनच्या भुमिका करुन रसिकांच्या टाळ्या व पाठीवर शाबासकीची थाप घेत होत्या.

बानुबाईची साधी राहणी,शब्दांची फेक,बोलण्याचा चढ उतार, अभिनयाची झेप आणि आवाजाचा चढ उतार यामुळे रसिक दंग होतात. टाळ्या व शिट्टयांच्या गजरात त्यांचे स्वागत करतात. आपल्या आवाजाच्या जादूने,नृत्याने, अभिनयाने संपूर्ण खान्देशच्यातील कलाहिरकणी बानुबाईची वाहवा करित आहे.बानुबाईने यांना कांताबाई सातारकर,राधाबाई नाशिककर,शांताबाई कोपरगावकर, हिराबाई कोचुरे, शेशाबाई बारडकर,छबुताई कराडकर,कोंडु पाटील,ओंकरराव खरे,नथु भाऊ सोनवणे,दत्तूबा गुरव या महान कलावंताबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

आज बानुबाईचे वय ६०वर्षाचे असून गेली ५०वर्ष रसिकांची सेवा करण्यात योगदान आहे.बानुबाई म्हणतात की, तमाशाचा जुना बाज फडमालकाने दाखविला पाहिजे. रसिकांचे ऐकले जाते ,आजचा तमाशा हा रसिकांच्या स्वाधीन झाला आहे असे म्हणावे लागेल.
फडातील प्रमुखांनी सुरूवातीला गणगवळण, रंगबाजी, फारसा किंवा टायटल आणि वगनाट्य हे होणारच असे जर रसिकांना लेक्चर मधुन सांगितले तर वावग ठरणार नाही.कारण जुनं तेच सोनं असते असे बानुबाई उदगारल्या……तसेच समाजप्रबोधन करून चांगले विचार रसिकांच्या पदरात पडावेत .असे त्या म्हणाल्या,बानुबाईने खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाची कलाज्योत रसिकांपुढे तेवत ठेवली आहे.रसिक त्यांच्या नावाची वाहवा करून ,शाबासकी देतात त्यांचा मोठा पुरस्कार आहे असे त्या मानतात.

शासनाने त्यांचा इतक्या वर्षाच्या रसिकसेवेचा विचार करून त्यांना छोटा मोठा पुरस्कार द्यावा ही त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.रसिकांची त्या मरेपर्यंत कलेद्वारे सेवा करणार असे त्यांनी ईच्छा व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाचा २०१८ साली सांस्कृतिक कार्य संचालयातर्फ ढोलकी फडात ३रा क्रमांक बानुबाई निकम या तमाशा मंडळाने पटकावला होता.
बानूबाई यांचे इतक्या वर्षाचे कलायोगदान प्रचंड आहे.त्यांनी आयुष्य कलेले वाहिले आहे.अशा हाडाच्या मुरब्बी अस्सल कलावंताचा आदर्श तरूण तमाशाकलावंतानी घ्यावा.
खरच बानूबाईच्या यांच्या हातुन रसिकांची, रंगदेवतेची ,सेवा घडो, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखक
शाहीर खंदारे
ता .नेवासा
मो.८६०५५५८४३२

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.