कुलस्वामी म्हाळसाकांत यात्रेसाठी जादा एस.टी. बस सोडण्याबाबत राजगुरूनगर आगाराला निवेदन!!

कुलस्वामी म्हाळसाकांत यात्रेसाठी जादा एस.टी. बस सोडण्याबाबत राजगुरूनगर आगाराला निवेदन!!
सालाबादप्रमाणे यावर्षीही कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा दि.५,६,७ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. राज्यभरातून लाखो भाविक यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे गर्दीचे प्रमाण लक्षात घेता धामणी ग्रामपंचायत,शिरदाळे ग्रामपंचायत व पहाडदरा ग्रामपंचायत यांच्या वतीने ज्यादा एस.टी. बस सोडण्याबाबत विनंतीपर निवेदन आज एस.टी. महामंडळ चालक व वाहक श्री.बोंबले व श्री.शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी धामणी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.रेश्मा अजित बोऱ्हाडे ,शिरदाळे गावचे उपसरपंच श्री.मयुरशेठ सरडे,पहाडदरा सरपंच पती श्री.संतोष कुरकुटे,शिरदाळे सरपंच पती श्री.गणेशशेठ तांबे,चेअरमन श्री.संदीपशेठ बोऱ्हाडे,शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष महेशशेठ कदम,सोसायटी संचालक दिपकशेठ जाधव,मा.सरपंच ठाकाशेठ रणपिसे,उद्योजक निलेश करंजखेले,दिनकर तांबे, अविनाश बोऱ्हाडे,विकास रणपिसे ,सतीश पंचरास उपस्थित होते.