आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

करंजगाव येथे राममंदीर अक्षदा कलश शोभायात्रा!!

करंजगाव येथे राममंदीर अक्षदा कलश शोभायात्रा!!

निफाड (वार्ताहर) :- अयोध्या रामजन्मभूमीतील अक्षदा मंगल कलशाची करंजगाव येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम मंदिरापासून टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ करण्यात येवून पालखी मिरवणुक काढण्यात आली. शोभायात्रा शनीचौक, हनुमान मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, ग्रामपालिका पटांगण येथून खंडेराव मंदिर प्रांगणात उत्साहात झाली. यावेळी शाळकरी मुलांनी रंगीबेरंगी कपडे परिधान केल्याने शोभायात्रा खुलून गेली होती. सियावर रामचंद्र की जय… एक ही नारा.. एक ही नाम.. जय श्रीराम… जय श्रीराम… अशा घोषणा यावेळी रामभक्तांनी दिल्या. पुढील आठवड्यात घरोघरी अक्षदा वाटप करून निमंत्रण देण्याचे नियोजन करण्यात आले. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याप्रसंगी करंजगाव राम मंदीर येथेही उत्सव सोहळा साजरा करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात. करंजगाव भजनी मंडळ, महिला भाविक व करंजगाव ग्रामस्थ यांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 करंजगाव येथे अयोध्येतील अक्षदा मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यावेळी सहभागी झालेले रामभक्त व ग्रामस्थ.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.