आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे मोडी लिपी प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणत्राचे वितरण!!

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे मोडी लिपी प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण!!

प्रतिनिधि – समीर गोरडे नारायणगाव

पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि ग्रामोन्नती मंडळाचे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोडी प्रशिक्षण वर्ग १०/१०/२०२३ते १९/१०/२०२३या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यामध्ये तब्बल एकशे तेरा लोकांनी अनेक जिल्ह्यांतुन आलेल्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
यामध्ये सोलापूर,जळगाव, नाशिक ,नगर, रायगड, बारामती, जेजुरी ,पुणे , मुंबई ,आदी ठिकाणांहून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना यामध्ये प्रवेश घेऊन मोडी लिपीचे शिक्षण घेतले असुन इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने देखील प्रशिक्षण घेण्यासाठी मोठा सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणाचा उद्देश पेशवेकालीन व ब्रिटिश काळातील कागदपत्रे मुख्यतः मोडी लिपीमध्ये आढळतात, तसेच मोडी लिपीमध्ये अनेक इतिहासकारांनी लिहिले असुन तसेच मोडी लिपीमध्ये अनेक शासकीय दस्त देखील पहायला मिळत असुन इतिहासातील मोडीलिपी वाचण्यासाठी मोडी प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे वाचन करण्यासाठी पुढील काळात या प्रशिक्षणार्थांची समाजाला मदत होईल असे मत सहायक संचालक, पुराभिलेख संचालनायांतर्गत पुणे पुरालेखागार,पुणे श्रीमती शैला की. जंगम यांनी मांडले. तर प्रशिक्षक म्हणुन अपर्णा कुलकर्णी, कल्पना कोंढावळे यांनी मोडीचे प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षण दिले.तसेच प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी, इतिहास विभागाचे प्रमुख लहु गायकवाड तसेच डॉ.उत्तम पठारे व राजेंद्र महानवर यांनी प्रशिक्षणांचे नियोजन केले..

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.