अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना महाडिबीटी अंतर्गत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन!!

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना महाडिबीटी अंतर्गत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन!!
प्रतिनिधी -शिंगवे पारगाव(समीर गोरडे)
आंबेगाव तालुका कृषी विभाग महाराष्ट्र शासन तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, मंडल कृषी अधिकारी निरगुडसर सोपान लांडे यांच्या वतीने तालुक्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना आणि विशेषत अनु. जाती व अनु.जमाती प्रवर्गातील शेतकरयांना महाडिबीटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे,यामध्ये कृषी यांत्रिकरण मध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारे तसेच पावर टिलर, स्प्रेअर, हार्वेस्तर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचयी योजने अंतर्गत ठिबक संच व तुषार संच तसेच पॉली हाऊस, शेडनेट हाऊस,कांदाचाळ,शेततळे व शेततळे अस्तरीकरण या सर्व घटकांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करून अनुदानाचा लाभ घ्यावा याविषयी आवाहन करण्यात येत आहे.
यामध्ये कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी अवजारांसाठी 40 ते 50 टक्के अनुदान तसेच ठिबक संच व तुषार संचासाठी 75 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमीन धारणेनुसार देय राहील असे मंडळ कृषी अधिकारी सोपान लांडे साहेब आणि निरगुडसर मंडळ कार्यक्षेत्रातील कृषिसहाय्यक प्रमोद भोर , सागर राठोड राजश्री पवार मॅडम,तसेच प्रवीण मिरके,सुनील लोहोकरे,सचिन जाधव ,निशा शेळके ,राहुल केंगारे, विकास गवई आपल्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रचार करत आहेत.