आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

निधन वार्ता-सुनील सांडभोर पाटील यांचे निधन

निधन वार्ता-सुनील सांडभोर पाटील यांचे निधन

राजगुरुनगर (भांबुरवाडी ता.खेड) येथील प्रगतीशील शेतकरी सुनिलराव विठ्ठलराव सांडभोर पाटील (वय ६३ वर्षे) यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने काल बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सात विवाहीत बहीणी, भाऊ,पत्नी,दोन मुले,पुतने,सुना नातंवडे असा परिवार आहे.त्यांच्या अकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खेड (भांबुरवाडी) येथील सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,सहकार क्षेत्रातील कामामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.मनमिळाऊ व प्रेमळ स्वभाव, सर्वाना सहकार्य करण्याचा त्यांचा लौकीक होता.अँडव्होकेट अभिषेक व राजगुरुनगर सहकारी बँकेतील अधिकारी आदित्य यांचे ते वडील तर राजगुरुनगर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अमोल सांडभोर पाटील यांचे बंधू होत.

राक्षेवाडी येथील गुडलक लंच होमचे दिनेशराव सांडभोर,वैभव सांडभोर,योगेश सांडभोर,सागर सांडभोर पाटील यांचे ते चुलते होते.

भिमा नदीच्या किनार्‍यावर झालेल्या अंत्यसंस्काराला शिरुरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे,अँड मुकुंदराव आवटे,शरद सहकारी बँकेचे मा.चेअरमन आण्णा पाटील जाधव,माळेगांव सहकारी साखर कारखाण्याचे मा.चेअरमन बाळासाहेब पाटील तावरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर पाटील,पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रणजित तावरे,मा.जिल्हा परिषद सदस्य रविराज तावरे,खेड मार्केट कमेटीचे मा.चेअरमन शांतारामबापू चव्हाण,कृषीभूषण अशोकराव तावरे,फत्तेसिंग जगताप, उद्योजक अभिजित जाधव पाटील,खेड मार्केट समितीचे उपसभापती अशोकराव राक्षे यासह खेड शहरातील सहकारी बँकीग,व्यापारी,शैक्षणिक,वकील क्षेत्रातील मंडळीसह खेड,आंबेगांव,बारामती,शिरुर,मावळ तालुक्यातील पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.