आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

दत्त जयंती निमित्त पारायण सोहळा संपन्न!!

दत्त जयंती निमित्त पारायण सोहळा संपन्न!!

प्रतिनिधी-जामखेड (समीर गोरडे)

मौजे वाकी लोणी बाळगव्हाण ता.जामखेड येथे ह.भ.प .सुदामती महाराज दाताळ यांच्या कृपेने ह.भ.प अनिल महाराज दिघोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला .कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे चार ते सहा काकड आरती सात ते दहा गुरुचरित्र पारायण दहा ते बारा गाथा भजन चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ रात्री सात ते नऊ कीर्तनाचा कार्यक्रम झाला दत्त जन्म निमित्त ह भ प कीर्तनकार ज्ञानेश्वरी ताई बोलबट वाकी यांचे कीर्तन संपन्न झाले.

यावेळी खरडा पोलिस स्टेशनचे APi जानकर साहेब, जामखेडचे नगरसेवक अमित चिंतामणी ‌उपस्थीत होते सुधामती महाराज दाताळ, भरत दाताळ, मधुकर दाताळ अनुसया दाताळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.