आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सागर निकाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत केला अनोखा विवाह..!!

सागर निकाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत केला अनोखा विवाह..!!

निफाड प्रतिनिधी-साधारणतः विवाहसोहळा म्हटला कि अनेक प्रकारचा गाजावाजा,फटाकड्यांची अतिषबाजी..एक वेगळाच थाटामाटात लग्न विधी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते.परंतु ज्या जोडीदारासोबत आपण विवाह करुन आयुष्यभर एकत्र राहण्याची ..एकमेकांना आहे तसे स्विकारुन एका नव्या आयुष्याला सुरुवात करतो त्या जोडीदारास आपण नेमके काय आहोत आणि आपली सामाजिक जबाबदारी काय आहे …हि गोष्ट लग्न मंडपातच दर्शवुन देणे गरजेचे आहे आणि उधळमाणकी न करता त्याच पैशातुन आपण अंध,अपंग तसेच पिडित घटकांना आधार देऊन एक आगळावेगळा विवाह सोहळा कसबे सुकेणे येथे पार पडला.माजी राज्यमंञी बच्चुभाऊ कडु ह्यांचे विश्वासु सहकारी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाउपाध्यक्ष वनसगांवचे भुमिपुञ .सागर प्रल्हाद निकाळे यांचा विवाह शिरसगाव येथिल अशोक शिरसाठ यांची कन्या व जितु जाधव यांची भाची आरती हिच्यासोबत पार पङला आपल्या स्वतः च्या विवाह सोहळ्यात अंध अपंगांना सायकली तसेच अंधकाठी/ दिव्यांग काठीचे वाटप केल्या .निराधार महीलांना साङी वाटप करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला.त्याचप्रमाणे सर्व राष्ट्र पुरुषांचे प्रतिमापुजनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यानंतरच वधुवरांनी विवाह सोहळ्याची शपथ घेतली.विवाह विधी आटोपल्यानंतर भारतीय घटनेचे संविधान प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.ह्या विवाहास तळागाळातील जनसमाज तसेच शैक्षणिक ,अर्थिक,राजकीय ,शासकीय,पञकारिता ,प्रशासन आदी सर्व क्षेञातुन अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन वधुवरांस आशीर्वाद व भावी वाटचालीस शुभकामना व्यक्त केल्या.ह्या सोहळ्यास उपस्थित प्रत्येक माणुस हा जातांना नुसता जेऊन गेला नाही तर वरील सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक करत आपल्यासोबत हा सामाजिक वारसा जपण्याचा संदेश घेऊन गेला या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा होत असुन मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे …

लग्नाचा अनावश्यक खर्च टाळुन दिव्यांगाना साइकल वाटप करतांना सागर निकाळे व सहकारी

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.