आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

श्री भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितांचा विचार केला-संस्थापक,अध्यक्ष मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील

भैरवनाथ पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते झाले अनावरण!!

श्री भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितांचा विचार केला-संस्थापक,अध्यक्ष मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील

भैरवनाथ पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते झाले अनावरण!!

केवळ नफा कमावणे हाच उद्देश न ठेवता, सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी भैरवनाथ पतसंस्था नेहमीचं अग्रेसर राहिली आहे.श्री भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितांचा विचार केला आहे.पतसंस्थेने अत्यल्प व्याजदरात गरजु व होतकरू तरुणांना वित्त पुरवठा केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दैनंदिनी, टेबल बुक, दिनदर्शिकाचे प्रकाशन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह 17 शाखा आहेत.संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाईन असून पतसंस्थेकडे आज अखेर 412 कोटी रुपयांच्या ठेवी असून 300 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.160 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सागर काजळे यांनी दिली.

यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालिका कल्पना आढळराव पाटील,संचालक योगेश बानखेले,राम तोडकर,अशोक गव्हाणे,शोभा आवटे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनिल बाणखेले,लहुजी वस्तादचे उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू,शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख संतोष डोके,शिवसेना आंबेगाव तालुका समन्वयक शशिकांत बाणखेले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे,विभागीय अधिकारी संतोष पाचपुते,वसुली अधिकारी श्याम गावडे,शाखाधिकारी अजित गवळी,शशिकांत निसाळ,अर्जुन आढळराव, राहुल बांगर, शालिवान गव्हाणे,राहुल बांगर,प्रमोद हिंगे,राजेंद्र साळवे,लांडेवाडी गावच्या सरपंच संगीता शेवाळे,उपसरपंच अंकुश लांडे, खंडेराव आढळराव पाटील, तानाजी शेवाळे, सदानंद शेवाळे, राजू शेवाळे, अंकुश शेवाळे,जालिंदर शेवाळे, नारायण लांडे उपस्थित होते.संचालक योगेश बाणखेले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.