आरोग्य व शिक्षणसामाजिक

नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!!

७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी देवळालीतील पत्रकाराचा सन्मान!!

नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!!

७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी देवळालीतील पत्रकाराचा सन्मान!!

नाशिक (प्रतिनिधी)- नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या प्रांगणामध्ये ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व संविधान यांचा आधार घेत देशाची सेवा करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यालय अधीक्षक विवेक बंड , आरोग्य अधिक्षक अमन गुप्ता, माजी नगरसेवक दिनकर पाळदे, सुरेश कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मोजाड,आर. डी. जाधव , वनश्रीपुरस्कार प्राप्त तानाजी भोर , संतोष गायकवाड उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी कु.जानव्ही रोकडे या विद्यार्थिनीने संविधानातील कलमाचे सादरीकरण केले. प्रमुख अतिथीच्या हस्ते कु जान्हवी रोकडेचा सत्कार करण्यात आला.तसेच देवळाली परिसरातील स्वच्छता दूत म्हणून पत्रकारांचा बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्या सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला.शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले व कार्यक्रमाची रंगत वाढवली.

प्रारंभी कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या प्राचार्या राजश्री खैरनार यांनी पाहुण्यांचे झाडांची रोपे देऊन स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता काळे,स्मिता पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन रोहिणी निकम यांनी केले.

कार्यक्रमास प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी पर्यवेक्षक पी .जी वैद्य , जगदीश धोंडगे, महेंद्र कापूरे,सौरभ देवरे, के.बी.शेवाळे, किरण जाधव सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.