आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील पारगाव, शिंगवे, निरगुडसर, मेंगडेवाडी,शिरदाळे,जवळे,भराडी लाखणगाव,देवगाव,पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक,जारकरवाडी ,लोणी, धामणी, वडगावपीर आदी गावांतील ग्रामपंचायत,सहकारी सोसायट्या,सहकारी दूधसंस्था व शाळांमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गावागावातून शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून भारत माता की जय, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, जय जवान जय किसान, या घोषणा देत प्रभात फेरी काढली. तसेच ग्रामपंचायत कार्यालय,सहकारी सोसायटी कार्यालय,सहकारी दूधसंस्था कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा,तसेच सरकारी कार्यालयासमोर ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे गायन विद्यार्थ्यांनी केले.
अनेक शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते .त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची भाषणे ही आयोजित करण्यात आली होती .यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त विविध विषयांवर भाषणे केली. त्याचप्रमाणे अनेक देशभक्तीपर गीते, शेतकरी गीते, व इतर गीत नृत्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी विविध शाळांमध्ये पार पडले.
या कार्यक्रमाला गावोगावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था ही अनेक गावांमधे करण्यात आली होती.अशा विविध कार्यक्रमांनी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.