आरोग्य व शिक्षणसामाजिक

येळकोट येळकोट,जय मल्हारचा लाईट अँक्रेलीक बोर्ड धामणी (ता.आंबेगाव) च्या देवस्थानाला अर्पण!!

येळकोट येळकोट,जय मल्हारचा लाईट अँक्रेलीक बोर्ड धामणी (ता.आंबेगाव) च्या देवस्थानाला अर्पण!!

धामणी ( ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाच्या दोन्ही महाद्बाराच्या मध्ये खंडोबाच्या मानाचे काठीचे मानकरी समस्त राजगुरु मंडळी (अवसरी खुर्द ता.आंबेगाव) यांनी ” येळकोट येळकोट,जय मल्हार ” या खंडोबाच्या जयघोषाचा अँल्युमिनियम शीट अँक्रेलीक वाँटरप्रुफ इलेक्ट्रीक आकर्षक बोर्ड २६ जानेवारीला (रविवार) बसवला असल्याचे देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत यांनी सांगितले.

यावेळी पांडुरंग मोराजी राजगुरु,नितेश राजगुरु,विनायक राजगुरु,प्रतिक राजगुरु,आतिश लोंढे,रोहीत लोंढे,शिवराज राजगूरु,शिवलिंग राजगूरु,सिताराम राजगूरु,निलेश राजगुरु,स्वप्निल राजगूरु,अशोक राजगूरु व समस्त राजगुरु मंडळी व खंडेराया काठी मंडळी उपस्थित होते.

देणगीदार राजगूरु मंडळीचा देवस्थानाच्या वतीने मानाचा फेटा व श्रीफळ देऊन सेवेकरी मंडळीनी सत्कार केला.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.