शिरदाळे (ता.आंबेगाव) गावचे मा. उपसरपंच, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष श्री.मयूर संभाजी सरडे यांनी अभिनव पद्धतीने साजरा केला वाढदिवस!!

शिरदाळे (ता.आंबेगाव) गावचे मा. उपसरपंच, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष श्री.मयूर संभाजी सरडे यांनी अभिनव पद्धतीने साजरा केला वाढदिवस!!
देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावे!! या संतवचनाप्रमाणे सामाजिक जाणीवेचे भान ठेवून, अनावश्यक खर्चाला फाटा देत, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून,सामाजिक बांधिलकी जपत आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे गावचे मा.उपसरपंच श्री.मयूर संभाजी सरडे यांनी आपला वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी येथील विद्यार्थ्यांसमवेत साजरा केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी केंद्र धामणी या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री सरडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय साहित्याचे मोफत वाटप केले.
याप्रसंगी पहाडदरा गावचे सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, मा. सरपंच मनोज तांबे, मा.सरपंच गणेश तांबे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन दीपक जाधव, संचालक जयदीप चौधरी, कैलास वीर,अक्षय रोडे,चेतन रोडे, प्रतिक गोरडे,शांताराम रोडे,आनंदा जाधव,बाळासाहेब बोराडे, मुख्याध्यापक इंदोरी मॅडम, पूजा सरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.मयूर सरडे हे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी समाजातील गरीब,गरजू, होतकरू, हुशार मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी नेहमीच योगदान देत असतात.गेली पाच वर्षे सदर उपक्रम ते राबवत आहेत.त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक केले जात असून अशा उपक्रमातून मानसिक समाधान मिळत असल्याचे सरडे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.