आरोग्य व शिक्षण

धुक्याने वाढवले बळीराजाचे टेंशन!!

धुक्याने वाढवले बळीराजाचे टेंशन!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात आज धुक्याचे साम्राज्य पसरले होते. या धुक्याने बळीराजाचे टेंशन वाढवले असून सध्या शेतात असणाऱ्या नगदी पिकांच्या उत्पादनावर या धुक्याचा विपरीत परिणाम होणार आहे. तसेच शिपणीचा खर्च ही या धुक्यामुळे वाढणार आहे.

मागील 8 दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. कधी थंडी, कधी कडक उन, कधी ढगाळ वातावरण, कधी धुके तर कधी पाऊस असे वातावरण दिसून येते आहे.

बदलत्या हवामानामुळे बळीराजा मात्र चिंतेत आहे. या हवामानामुळे आंब्याचा मोहोर गळून पडणार आहे. शिवाय कांदा, टोमॅटो, बीट, मका आदी पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा शिपनीचा खर्च वाढणार आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.