आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचा कु.देव्यांशू देसाई जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेत यश..

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचा कु.देव्यांशू देसाई जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेत यश..

शहापूर- शहापूर तालुक्यातील मोहिली- अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित (कोकमठाण) परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचा (सीबीएसई) इयत्ता८ वीतील कु. कु. देव्यांशू देसाई हा विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाला.

कु. देव्यांशूचे यश हे त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि शिकण्याची आवड यांतून यश मिळाले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देव्यांशू आणि त्यांच्या कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन. ही कामगिरी खरोखरच आपल्या आत्मा मालीक इंटरनॅशनल स्कूल व आत्मा मालीक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल शहापूर विभागासाठी मानाचा सुवर्णपंख आहे.
कु देव्यांशू देसाईला पुढील वाटचालीसाठी परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलीच्या कृपा आशीर्वादसह, समस्त संत परिवार, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमारजी सुर्यवंशी साहेब, समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री उमेशजी जाधव साहेब, स्थानिक सदस्य अनंत गायकवाड,प्रवीण मोरे जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे, शैक्षणिक संचालक डॉ डी डी शिंदे,आत्मा मालीक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अनिल पाटील आणि सर्व सी. बी. एस. ई. शिक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.