खडकवाडी (ता. आंबेगाव) च्या गावठाणातील कमी उंचीच्या वीजवाहक तारांची तात्पुरती का होईना पण झाली डागडुजी!!

लोणी(धामणी) प्रतिनिधी – खडकवाडी (ता. आंबेगाव) च्या गावठाणातील कमी उंचीच्या वीजवाहक तारांची तात्पुरती का होईना पण झाली डागडुजी!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या खडकवाडी गावातील गावठाणातील वीजवाहक तारा कमी उंचीवर आल्याने वाहतुकीसाठी अडथळा ठरत होत्या. मा. सरपंच श्री. अनिल डोके, उपसरपंच श्री. एकनाथ सुक्रे, दिलीप डोके यांनी संबंधित विभागाकडे या बाबत वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर तात्पुरत्या स्वरूपात या तारांची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र ही तात्पुरती मलमपट्टी न करता या तारांची कायम स्वरुपी दुरूस्ती करावी अशी मागणी वीजवितरण विभागाकडे केली आहे.
खडकवाडी गावातून बेल्हा – जेजुरी हा महामार्ग गेला आहे. गावठाणात विविध व्यावसायिक व्यवसाय करतात. या भागात बारमाही पाणी उपलब्ध असल्याने नगदी पिकांची नेहमीच रेलचेल असते. त्यामुळे व्यवसाय हेतुने गावठाणात मोठया वाहनांची वर्दळ असते. पण या वीजवाहक तारा निर्धारित उंची पेक्षा खाली आल्याने वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. या तारा उंचीवर नेणे गरजेचे असल्याचे स्थानिक प्रशासनाने संबंधित विभागाला वेळोवेळी कळवले होते. अखेर प्रशासनाने याची दखल घेत वीजवितरण विभागाचे अधिकारी श्री. गेटमे साहेब, नितीन शिंघे, सचिन आरुडे या तारांची डागडुजी केली आहे.
शिवसेना उपनेते, मा. खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वीजवितरण विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हे काम कायमस्वरुपी मार्गी लावण्याबाबत फोनवरून चर्चा केली. येत्या चार दिवसांत हा प्रश्न कायस्वरूपी निकालात काढला जाईल असे आश्वासन वीजवितरण विभागाचे अधिकारी यांनी ग्रामस्थांना दिले आहे.