आरोग्य व शिक्षणसामाजिक
शारदा इंग्लिश मीडियम स्कूल वासिंद मध्ये दिंडी सोहळा !!


पंचनामा शहापूर प्रतिनिधी – वासिंद येथील विद्या विकास मंडळ संचलित शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त शहरात दिंडी काढून भक्तीमय सोहळा उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी व वारकरी या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढून ध्वज, पताका, अभंग, गवळणीच्या स्वरात शहर दुमदुमले होते. या दिंडीत सुमारे ७०० विद्यार्थी, संस्था पदाधिकारी, भाषिक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. विद्याथ्यांनी नृत्ये, समूहगीते, अभंग, गवळणी सादर करून विठुराया व ज्ञानबा-तुकारामांच्या गजरात दिंडी सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी चेअरमन विठ्ठल सातवी, रंगनाथ काठोळे, खंडू कंठे, अनिल महाजन, प्राचार्य प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.
