आठव्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा नासिक येथे उत्साहात संपन्न !! महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे सांघिक विजेतेपद !!


पंचनामा नाशिक प्रतिनिधी – आठव्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा मीनाताई ठाकरे इंडोअर स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल पंचवटी, नाशिक येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धा ग्रॅपलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, ग्रॅपलिंग असोसिएशन ऑफ नाशिक यांनी आयोजित केल्या होत्या व ईश्म स्पोर्ट्स अँड फिटनेस क्लब यांनी प्रायोजित केले. ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेकरिता संपूर्ण भारतातून 19 राज्यांच्या संघाने सहभाग नोंदविला.
हरियाणा, आसाम, त्रिपुरा, पंजाब, कर्नाटका, केरळ, बिहार, जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात, गोवा वरील राज्यातील एकूण 425 खेळाडूंनी व 77 ऑफिशियल, रेफ्री, पंच यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा युथ, सीनियर, वेटरन्स महिला व पुरुष या वयोगटात विविध वजन गटात तसेच ग्रॅपलिंग व ग्रॅपलिंग नोगी या दोन खेळ प्रकारात घेण्यात येत आहेत. या स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू यु डब्ल्यू डब्ल्यू वर्ल्ड ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप २०२५ या जागतिक कुस्ती महासंघाच्या अधिकृत जागतिक लेवलच्या ग्रॅपलिंग खेळाच्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करतील. या स्पर्धा 14 ते 17 ऑक्टोबर रोजी नोवी सद, सरबिया येथे संपन्न होणार आहेत.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय ग्रॅपलिंग महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री ओपी नरवाल आयपीएस आईजी, हरियाणा हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते, तसेच त्यांच्या समवेत राष्ट्रीय संघटनेचे खजिनदार बलविंदर सिंग, महासचिव सुबोध यादव, महाराष्ट्र ग्रॅपलिंग संघटनेचे अध्यक्ष अर्चना देशमुख, महासचिव संतोष देशमुख, रेफ्री पॅनल अध्यक्ष व जागतिक पंच मुलतान सिंग राणा, संजय पवार, पार्थ सरकार, क्रीडा अधिकारी रंजना बुरुकुल, क्रीडा अधिकारी मिलिंद वेरुळकर, व श्रीकांत मैढ, माजी नगरसेविका प्रियंका ताई माने, नूर आलम, इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, याप्रसंगी खेळाडूंनी संचालन करून खेळांची विविध प्रात्यक्षिके सादर केली, आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ग्रॅपलिंग हा खेळ शालेय क्रीडा महासंघ तसेच राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा अंतर्गत याचा समावेश आहे.

आज या स्पर्धेत ग्रॅपलिंग गी या खेळ प्रकारातील स्पर्धा संपन्न झाल्या. या खेळ प्रकारात प्रामुख्याने महाराष्ट्र हरियाणा वेस्ट बंगाल, केरला बिहार हिमाचल प्रदेश उत्तराखंड या खेळाडूंनी चुरशीचे सामने लढवत अधिकाधिक पदके पटकाविली.
महाराष्ट्र हरियाणा मध्य प्रदेश वेस्ट बंगाल यांमध्ये पदक तालिकेत नुसार अत्यंत चुरस निर्माण झाले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांकाचे सांघिक विजेतेपद पटकाविले.
द्वितीय क्रमांकाचे सांघिक विजेतेपद हरियाणा राज्याला मिळाले.
तृतीय क्रमांकाचे सांघिक विजेतेपद मध्य प्रदेश राज्यास मिळाले.व चौथ्या क्रमांकाचे सांघिक विजेतेपद केरळ राज्यास मिळाले.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता महाराष्ट्र संघटनेचे टेक्निकल डायरेक्टर संदीप बोरसे, प्रशांत आहेर, अक्षय आंबेकर, अनिकेत भवर, क्षितिज सापुते, सनी सिंग, माधुरी ठोंबरे, शावेज खान, सागर बोरसे , राशी खैरनार, धर्मेश प्रजापती, उमेश थोरे, ईश्म देशमुख, अक्षदा चतुर, रितिका आहेर, साहिल कदम, वेदांत कडबाने, शंकर गुरुळे, हे प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातून पंच म्हणून अविनाश वाडे, प्रशांत बच्छाव, प्रशांत आढाव, दुष्यंत राजे देशमुख, स्नेहल पवार रवी गायकवाड, मुकेश पांडे, ईश्म देशमुख यांनी राष्ट्रीय पंच म्हूणन योगदान दिले.



