मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न !!


पंचनामा मंचर प्रतिनिधी -आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय शारीरिक शिक्षण विभाग,राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस.गायकवाड व उपप्राचार्य डॉ. सालके सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.एस.पाटील व पारधी सर,राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख डॉ.आर.बी.गावडे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.डॉ.प्राचार्य साहेब व सर्व स्वयंसेवक,शिक्षकेत कर्मचारी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून आपल्या रक्तदानातून आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो.त्यामुळे रक्तदान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी रक्तदान केल्याबद्दल त्यांना टिफिन,बॉटल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पानसरे सर केले. उपस्थित सर्वांचे आभार प्रा.पारधी सर यांनी मानले.

