पारगाव (शिंगवे) येथून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरीकडे रवाना!!


आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथून मुक्तादेवी पायी दिंडी सोहळा व संत ज्ञानेश्वर प्राथमिक भजनी मंडळ पारगाव हा दिंडी सोहळा पंढरीच्या दिशेने रवाना झाला आहे.

आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे.संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने जात आहे.अवघ्या काही दिवसात या पालख्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत पोहोचणार आहे.आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमधून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायीवारी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

पारगाव हे गाव आंबेगाव तालुक्यातील धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे गाव आहे. गावच्या एकीच्या जोरावर गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन केले जाते. तरुण व वृद्ध यांचा योग्य समन्वय साधक गावात सर्व प्रकारची कार्य यशस्वीरित्या पार पाडली जातात.पारगावला आळंदी,पंढरीच्या वारीची मोठी परंपरा आहे.या परंपरेत मुक्तादेवी पायी दिंडी सोहळा व संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ यांचा मोलाचा वाटा असतो.

आज पंढरीच्या दिशेने पारगाव नगरीतून 70 ते 80 भावीक रवाना झाले.त्यांना पारगाव येथील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

याप्रसंगी शरद बँकेचे संचालक दौलतराव लोखंडे,मा.सरपंच बबनराव ढोबळे,मा.अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती बजरंग देवडे,अध्यक्ष भागचंद पोंदे,युवा नेते निवृत्ती ढोबळे,चंद्रकांत लोखंडे,ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम वैद्य,निवृत्ती लोखंडे,भगवान कापडी,बाळासाहेब ढोबळे ,ज्ञानेश्वर ढोबळे,बारकुनाना ढोबळे,किरण ढोबळे, पांडुरंग ढोबळे, ज्ञानेश्वर देवडे,गोरक्ष पोंदे,नितीन ढोबळे, बारकु ढोबळे,सुधीर ढोबळे,विठठल दातखिळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

