ज्या दिवशी घुंगरू तुटतील…….
कलाकार श्री. विनोद अवसरीकर यांच्या लेखणीतून साभार!!

नमस्कार मित्रांनो मी… खूप मोठा लेखक नाही, परंतु कधी कधी एकटा….. बसलो की मनात कलाकारांबद्दलचा विचार येतो,
मी ही….. एक कलाकार आहे ,
व माझ्या जवळच्या कलाकारांनी कस आयुष्य भोगल असेल,
माझ्या आधीच्या कलाकारांची राहणीमानी कशी असेल ,
हे सगळे प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहातात, आणि म्हणून मनात आलेल्या प्रश्नांचं उत्तर मीच शोधण्याचा प्रयत्न करतो.
तो लिखाणाच्या माध्यमातून…….
आणि खरच ते उत्तर मिळाले की नाही.
म्हणून लिहिलेलं तुमच्यासारख्या वाचकांच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो.
तुम्ही ते वाचल्यावर कदाचित माझ्या मनात माझ्या सहकारी कलाकारांबद्दलची असलेली तळमळ ही मला तुम्ही दिलेल्या रिप्लाय वरून समजते.
असंच आज एका कलाकाराबद्दल बोलणार आहे.
आतापर्यंत अनेक कलाकारांच्या अनेक इच्छा आकांक्षा मनात दाटून राहिलेली स्वप्न,
त्यांनी कधीच कुणाला बोलून दाखवली नाही. आणि बोलून दाखवली असतील तर ती आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने.
कोणी कलाकारांनी म्हातारपणात सरकारकडून मानधन मिळावं .
उच्च प्रतीचा सन्मान मिळावा.
तर म्हातारपणी उरलेले आयुष्य जगण्यासाठी सरकारी आधार मिळावा .
असं सांगितलं असेल .
परंतु मी ज्या कलाकाराबद्दल लिहितोय त्या कलाकाराचे स्वप्न मात्र वेगळाच आहे.
तो सरळ सरळ म्हणतो……. की मला यापैकी काहीही नको.
त्या रंगदेवतेची सेवा मी अनेक वर्ष केली.
यदा कदाचित माझा शेवटही त्याच रंगभूमीवर त्याच रंग देवतेवर झाला तर….
त्याच्यासारखं दुसरं सुख मला कशातच नाही. आणि हे ऐकल्यावर नकळत माझ्या लेखणीने लिहायला सुरुवात केली.
तेच सारं लिहिलेलं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.
खरं तर हा कलाकार तो…..नसून… ती आहे. आणि तिची……. ही छोटीशी गोष्ट ….
मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आवडली तर नक्कीच तुम्ही मला प्रेमाचा आशीर्वाद द्याल ही अपेक्षा…
……!! ज्या दिवशी घुंगरू तुटतील…..!!
शिट्ट्या टाळ्यांनी त्या दिवशी सारा परीसर दुमदुमला होता…..
….आज ती…..
स्टेजवर आशी… बेभान होऊन नाचली …
गायली…. शरीराचा थकवा तिनं आपल्या चेहऱ्यावर जाणूनच दिला नाही .
गाणं संपलं की पुन्हा पाठमोरी झाली …
आणि स्टेजच्या माघे निघाली..
तोच आरडा ओरडा सुरू झाला… मैदान कसं गजबजून हाऊसफुल होऊन गेलं होतं .
त्यात इंग्रज आपल्यावर थोपवूण गेलेल्या …
त्या इंग्रजी भाषेची ती…. वाक्य कानावर सारखी आदळत होती…
म्हणजेच….. वन्स मोर …वन्स मोर….
भरधाव आगगाडीच्या इंजिनाला थांबवून थोडं रिव्हर्स घेऊन पुन्हा भरधाव वेग द्यावा….
आणी… अचानक धुराचे लोट पसरावे….
लोखंडी पटरीवर धावणाऱ्या….
लोखंडी चाकातून वेग धरताच…उडणाऱ्या त्या ठिणग्या…… असंच काही तिची आज….
अवस्था झाली होती….
घामानं ओलचिंब झालेले शरीर….. चेहऱ्यावर थकवा..न… जाणवू देता….
एकदम…. भूकंपाच्या धक्क्याने देवळावरचा तो कळस थरथरावा ….आणि आपली जागा न सोडता सूर्यप्रकाशात अचानक डोळ्यांच्या पटलावर येऊन धडकवा ….
आणि त्या क्षणी पापण्या बंद व्हाव्या ….
मग…पुन्हा त्या सोनेरी कळसान आपल्या जागेवर स्तब्ध राहावा…. आणी आचानक पाहणाऱ्याने त्याच्याकडे एक टक लावून पहावे. असा तिचा तो… पुन्हा प्रवेश….
……………ती म्हणजे…… मध्यम बांधा…
रंग सावळा…. उंची अगदीच कमी ……पण समोरच्या बरोबर बोलताना सरळ त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची तिची वेगळीच काय ती पद्धत……
शिक्षण जरी कमी असलं ,
तरी समोरच्याला ते जाणून न देता भाषेची असलेली पकड,……. तिचा तो शब्द साठा, सामान्य घरात जन्माला आली असताना… त्याची लाज न बाळगता ,
आपल्या राहणीमानीतून आणि बोलण्या चालण्यातून स्वतःची अस्तित्व निर्माण करण्याची तिची जिद्द, आणि ताकद……
खरंतर सोळा वर्षाच्या मुलीला…ही…. लाजवेल अशी ती…… आयुष्यातलं अर्धशतक पार केलेली ती म्हणजे…… सळसळती नागिन.. हरणाची चपळाई ……
जर बरसलीच कधी… तर ढगांच्या गडगडा….सह… मुसळधार… हत्ती नक्षत्रातला बेभान झालेला पाऊसच जणू …. ती….
ती….म्हणजे…. सरस्वतीच देण….
नटराजाच्या नावानं भाळी लेलेल..चंदनाच लेन…
….सुरांना लाजवेल असं बेधुंद गाणं …..आणि हे सगळं एकत्र करून शारीरिक व्याधी सांभाळत रसिक हेच माझं दैवत म्हणून….. थोरामोठ्यांच्या पायावर आदबीन वाकत…. तरुण पिढीला सहज शिकवून जाणार ,
तिचं ते साधं सूद वागणं …..
हो… मी… तिच्याबद्दलच बोलतोय ….ती…म्हणजे …
मायाळू…… कनवाळू….. दयाळू…. आणी तेवढीच ती श्रदाळू….आशी…ती….
खर तर …
शांत स्वभाव ,सरळ वागणं, पायातला चाळ हे आपलं जगणं नसून जगण्यासाठी अनेक वाटा असतात ,
फक्त दिशा सापडावी लागते. परंतु तिच्या आयुष्यातील दिशा ह्या तिच्या जगण्याच्या दशांपासून खूप दूर गेल्या होत्या ….
कृष्ण काळा आहे,… पण तो सावळा,.. ही आहे, आणि याच सावळ्याच्या भक्तीत तल्लीन होणारी ती सावळ्याची,,, म्हणजेच,,,
( सावळेराम बुवा काळे) याची…निरागस,,शांता,, ( शांता सावळेराम काळे)…. या उभयातांची लाडकी कन्या म्हणजेच……ती…..!!
असं म्हणतात माशाच्या पिलाला पोहायला शिकवावं लागत नाही, म्हणून की काय उपजत कलेचा वारसा रक्तातूनच मिळाला असावा कदाचित तिला,
वयाच्या तिसऱ्या वर्षी…. चेहऱ्याला रंग रंगोटी करून ती तमाशाच्या स्टेजवर उभी राहिली ,
ती… आई वडिलांच्या सांगण्यावरून,
तिचं पहिलं काम होतं… ते..म्हणजे
…भक्त पुंडलिक या वगनाट्यातील,,
विठ्ठलाची मूर्ती म्हणून उभे राहणं ,,,
आपल्या लाडीला कुणाची नजर न लागू म्हणून लेकराला म्हणजेच काळ्या,,,, विठूला गालावर काजळाचा तीठ लावणारी शांता,,,,,म्हणजे तीची माय….
…..आज भारावून गेली होती,,,, सावळा,,, साठी ती आज त्याचा विठू नाही…. तर तिच्यात त्याला…. त्याची रुक्मिणीच दिसत होती… आणि मग सुरू झाला..
!!.. चाळ आणि टाळ …!!
यांच्या सानिध्यातला तिचा तो खरा खुरा प्रवास.. १०\२\ १९७२\तो कालखंड… उभ्या महाराष्ट्राला दुष्काळाने ग्रासलं होतं,
लोकांची दयनीय अवस्था झाली होती ,,
खाद्यातलं.. गहू ,तांदूळ, बाजरी, ज्वारी, या धान्याचा तुटवडा झाला म्हणून की काय …
,,,,मिलू,, नावाच्या धान्यानं मानव वस्तीतील त्यांच्या रोजच्या जेवणात प्रवेश केला होता, रोजगार हमीवर जाताना… लोकांच्या हातावरच्या रेषाच पुसल्या गेल्या होत्या, सगळीकडे कशी तारांबळ उडाली होती,
त्यात तमाशा सारखा व्यवसाय हात घाईला आला होता,,,, शनिने आपली वक्रता वाढवली होती ,,,,
आणी तो दिवस उगवला…. वार शनिवार… महाशिवरात्र,,,,, फड ….दत्तोबा तांब्याचा .
आणि फडात अचानक बातमी पसरली. सावळाच्या शांताला… मुलगी झाली,,,, दुष्काळाचं सावट त्यात पदरात पहिली एक मुलगी,,,, असताना हिचा जन्म झाला …
जणू तिने गरिबी आणि दारिद्र्याच्या सगळ्या सीमाच पार करून जन्म घेतला होता,,,
माय…. शांता…. नेहमी म्हणायची …
हे..ही… दिवस जातील,
आणि म्हणून की काय .. या लखलखत्या तार्याचं नाव…शांता आणि सावळा ..न ..
मोठ्या आनंदाने…,,,,,, _सीमा_,,,,, असं ठेवलं,,
वर्ष संपू लागली, दुष्काळ सरला ,तशी तशी शांता सावळाची,, ही परी मोठी होऊ लागली, पण शांत बसेल ती शांता कसली,
तिने या नटखट विठूला शाळेत घालायचं ठरवलं,
सावळा आणि शांता पोटासाठी भटकंतीवर होते,…. तर माझी विठू माऊली शाळेतील पाठीवर श्री गणेशा गिरवू लागली,…जेमतेम अवघ्या चार वर्गाच्या पायऱ्या चढल्या पोरीन
त्यात ….पोर… मोठी व्हायला लागली ,
म्हणून की काय… विद्येच्या…देवतेला शेवटचा नमस्कार करून …वर्गातील ,क, ख, ग ,
आता तमाशाच्या फडात… पायात चाळ बांधून ढोलकीच्या मात्र्यावर….तालातील ठेका मोजू लागले….
शाळेतील मास्तर मागे पडला ..
आणि त्याची जागा घेतली नवीन गुरुजींनी ..
उत्तम शात्रीयनर्तकी ,विटा कुडाळकर, यांनी तिचा अभ्यास घ्यायाला सुरवात केली,
म्हणून आदर्श …आई वडीलान बरोबर गुरूजीनाही मानण्यात आल….
पायातला चाळ आता ताल धरू लागला होता, तसा तसा अनुभव आणि वयाने पुढचा पल्ला गाठायला सुरुवात केली होती,
सोळावं वरीस धोक्याचं ग…धोक्याचं…हे गीत आजही गुणगुणावसं वाटतं,
कारण हे वयच अस असत,
श्रावणाची चाहूल लागताच झाडे, वेली ,आपली मरगळ झटकून टाकतात , नवीन आयुष्यासाठी नवीन पाने फुले बहरून येतात,,,
पहिल्या पावसाच्या तोंडावर निसर्ग हिरवा गार दिसू लागतो,,, तसंच मानव शरीराच…एकदा वयात आलं की चाहूल लागते ती…आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदाराची ,,,,
तिने सोळावं पार केलं,,,, आणि तिची नजर भिरभरू लागली ,,,,त्या भिरभिरत्या नजरेने सावज हेरलं खरं,,,,, पण ते आयुष्यभर साथ देण्यासाठी,,,, आपलं सारं आयुष्य त्याच्या हावाली करून द्यावं असं तिला वाटलं ,,,
तीकडे …तोही.. आपल्याला आयुष्यभर साथ देईल असाच जोडीदार शोधत होता,,
नकळत एकमेकांच्या नजरेला नजरा भिडल्या, मन एकमेकांकडे ओढ घेऊ लागली,,
तसा तो… दिसायला कमी नव्हता,,,,
गोरा गोमटा ,,, माफक उंची,,, कसरतीने कसदार आणि पिळदार झालेले शरीर,,,
शिवाय नुकताच त्याचेही सोंगाड्या म्हणून फडात नाव होऊ लागलं होतं ,,,
राज कुमारा सारखा नाही…. पण ..राजबिंडा नक्कीच दिसत होता….
एकमेकांना एकमेकांकडून होकार आला,
पण म्हणतात..ना.. दोन जीवांना एकत्र येऊ देतील तो समाज कसला,,झल..
आलाच आडवा समाज,…खर तर ..
लोक म्हणतात… भिंतींनाही कान असतात.
पण इथे तर सारच… साम्राज्य कपड्याचं होतं, त्या कनातीच्या भिंतींना कानही होते,
आणि आरपार दिसणारे डोळेही होते ,
काहींचे डोळे विस्पूरले…. तर काहींनी एकमेकांचे कान कुजबूज करायला सुरुवात केली…..
राजा राणीच्या संसाराला सुरुवात करण्या अगोदरच अर्ध्यावरती डाव मोडायला आला, त्यातच ,,,,शांता,,,न…शांत पणे विचार केला, प्रेमात आडवी येणारी माय…..आता लेकरासाठी गाय…. झाली… आणि सुधाकर सारखा जोडीदार आपल्या मुलीला शोभतो खरा म्हणून त्यांच्या विवाहाला सहमती दर्शवली ,,,,,
झाला संसाराचा गाडा सुरळीत सुरू झाला… फडतल,,, घुंगरू,,,आता मोठ्या स्टेजवर वाजू लागली…. लक्ष्मीनेही आशीर्वाद द्यायला सुरुवात केली …भाड्याचं घर सोडून स्वतःच टुमदार महाल तयार झाला…. त्या राजा राणीचा फड सुटला….. आणि नाट्यगृहात प्रवेश झाला… अनेक संकटांना तोंड देत देत संसार फुलला… वेलीवर फुल उमलू लागल,,,,आज ती आनंदात दिसते खरी,,,, पण मागच्या वेदनांची सल अजूनही तिला स्वस्त बसू देत नाही ….कारण कष्टाने कमावलेला तुटुमदार महाल काही कारणास्तव दुसऱ्याच्या हाती सोपवावा लागला.. खरंतर लहानपणाची तिची इच्छा अपूर्णच राहिली… शिकून सवरूण… तिला बॅरिस्टर(वकील) व्हायचं होतं…. अंगावर काळा कोट चढवून मोठ्या दिमाकांत तिला वावरायचं होतं…. पण नियतीचा खेळच वेगळा होता… अंगावर काळा कोट आलाच नाही ….या उलट संकटांना सामोरे जाताना काळ रात्री अनेक वेळेस येऊन गेल्या …..त्या रात्री…नि… तिची खरंतर झोपच उडवली… कधी कधी ती अचानक एकटीच गालात हासते,,,, तो दिवस आठवते,,, ज्या दिवशी तिने विठ्ठलाची भूमिका केली होती…. आणि नकळत एकटीच डोळ्यात अश्रू दाटून रडते….की ज्या दिवशी तिला रुक्मिणीच्या रूपात पाहणारा तिचा जन्मदाता म्हणजेच…..,,, शांताचा सावळा,,, तिच्या समोर तिला सोडून ,,,हा… देह..येथेच ठेवून परलोकी निघाला होता….
…खर तर तिच…. आता एकच स्वप्न आहे ..
या देहाला ज्याने जगायला शिकवलं ….मान सन्मान मिळवून दीला…
त्या रंगदेवतेवरच…..
तिचा……. तिच्या…….. बापा सारखा शेवटचा श्वास तुटावा ,,,,,,
आणि ती आवर्जून म्हणते ,,,,
!! ,,,,,,ज्या दिवशी घुंगरू तुटतील,,,,,,,!!
त्या दिवशी माझ्या देहात प्राण नसेल …
कदाचित तुझं हे स्वप्न पूर्ण होऊ …
………..पण….?
तुझ्यासारखा एक उत्तम आणि चांगला कलाकार आम्हा रसिकांना पुन्हा भेटणार नाही याचीही खंत वाटते…..
आमच आयुष्य तुला लाभो ….आणि म्हणून ….तू सदैव आमच्यात असावी असं पुन्हा पुन्हा वाटतं. ….
…..आणी पुन्हा,,……… बघता….बघता …..पुन्हा अर्डा ओरडा सुरू झाला…. वन्स मोर …वन्स मोरच्या …किंकाळ्या कानावर येऊ लागल्या… आणि ती आली …आणि आकाशात वीज लखाकून जावी अशा …अभीर भावात… आपली अदाकारी सादर करून पुन्हा मागे निघूण गेली ….
अन आम्ही मात्र तिच्या पाठमोऱ्या सावलीकडं पहात राहिलो….. आणि तिचं ते वाक्य आठवत राहिलो……
……..!! ज्या दिवशी घुंगरू तुटतील…..!!
या लेखातील…ती….म्हणजे
!!..सौ..सिमा सुधाकर पोटे,..!!
लेखक ………..
…विनोद अवसरीकर ………✒