शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार सप्तशृंगी मातेचा वर्धापन दिन सोहळा!!

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार सप्तशृंगी मातेचा वर्धापन दिन सोहळा!!
आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे मंगळवार दि.12 मार्च 2024 रोजी आई सप्तशृंगीचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी पंचनामाशी बोलताना दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 7.00 ते 8.00 या वेळेत देवीचा दुग्ध अभिषेक,दु. 4.00 ते 7.00 देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम,संध्या.7.00 ते 7.30 देवीची महाआरती,8.00 वा. हनुमान प्रसादिक भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच 7.30 ते रात्री 10.00 अन्नप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. समस्त ग्रामस्थ शिरदाळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशातील सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ शिरदाळे यांनी केले आहे.