जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे शनिवार दि.८ मार्च २०२५ ते सोमवार १० मार्च २०२५ रोजी रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार!!
ग्रामदैवत वडजादेवीच्या यात्रा उत्सवानिमित्ताने बैलगाडा शर्यती सोबतच विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम पडणार पार!!

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे शनिवार दि.८ मार्च २०२५ ते सोमवार १० मार्च २०२५ रोजी रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार!!
ग्रामदैवत वडजादेवीच्या यात्रा उत्सवानिमित्ताने बैलगाडा शर्यती सोबतच विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम पडणार पार!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी येथे गावचे ग्रामदैवत वडजादेवीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शनिवार दि.८ मार्च २०२५ ते सोमवार दि.१०मार्च २०२५ रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यात्रा उत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत देवीला अभिषेक,हारतुरे व मांडव डहाळे, सकाळी ८ ते सायं.६ या वेळेत बैलगाड्याच्या भव्य शर्यती, रात्री ९ ते ११ या वेळेत छबिना व पालखीची मिरवणूक,रात्री ११ नंतर विठ्ठलकृपा नाट्य कला मंडळ,जारकरवाडी यांच्या भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत बैलगाड्याच्या भव्य शर्यती , सायं.४ ते ७ कुस्त्यांचा आखाडा, सायं.५ ते ८ या वेळेत शेरनी वाटप, रात्री नऊ वाजता संगीताची राणी मंगला बनसोडे करवडीकर सह नितीनकुमार बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच सोमवार दि.१० मार्च २०२५ रोजी बैलगाडा शर्यती संपन्न होणार आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी ७५,०००/- तर दोन्ही दिवशी पहिल्यात पहिल्या येणाऱ्या गाड्या ८००१/- रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. द्वितीय क्रमांकसाठी ६१,०००/- हजार रुपयांचे बक्षीस तर दोन्ही दिवशी दुसऱ्यात पहिल्या येणाऱ्या गाड्यांसाठी ५००१/- रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तृतीय क्रमांकासाठी ४१,०००/- हजार रुपयांचे बक्षीस तर दोन्ही दिवशी तिसऱ्यात पहिल्या येणाऱ्या गाड्यांसाठी २,५०१/- रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी २१,०००/- रुपयांचे बक्षीस व दोन्ही दिवशी चौथ्यात पहिला येणाऱ्या गाड्यांसाठी २,१०१/- रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे.
घाटाचा राजा या किताबासाठी रोख रुपये चार ४००१/- बक्षीस दिले जाणार अजून वीस फुटांवर कांडे लावणाऱ्या विजेत्या गाड्या २,५०१/- रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे.
याशिवाय प्रथम क्रमांकात आलेल्या गाड्यांची फायनल देखील संपन्न होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या फायनलसाठी १५,००१/- द्वितीय क्रमांकाच्या फायनलसाठी ११,००१/- रुपये तृतीय क्रमांकाच्या फायनलसाठी ७००१/- रुपये चतुर्थ क्रमांकाच्या फायनलसाठी ४००१/- रुपयाची बक्षीस देण्यात येणार आहे.
या निमित्ताने घोड्यांच्या भव्य शर्यती देखील संपन्न होणार असून प्रथम क्रमांकासाठी १००१/- द्वितीय क्रमांकासाठी ७०१/- तृतीय क्रमांकासाठी ५०१/-रुपयाचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
या निमित्ताने समर्थ क्रॉप केअरचे फाउंडर मेंबर, यात्रा उत्सव समिती अध्यक्ष श्री. रामहरी दगडू देवडे यांनी देवीच्या चरणी १०१ किलोची पितळी घंटा अर्पण केली आहे.
यात्रोत्सवादरम्यान महाराष्ट्र राज्याचे मा.सहकारमंत्री ना.दिलीपरावजी वळसे पाटील,शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार,पुणे म्हाडाचे सभापती (राज्यमंत्री) शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील, खा.डॉ.अमोल कोल्हे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती देवदत्त निकम,शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख सुरेश भोर,समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक,अध्यक्ष प्रशांत गवळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे मा.सहकारमंत्री ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून नवीन घाटाच्या बांधकामासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या यात्रोत्सवामध्ये पंचक्रोशीतील सर्व गाडा शौकिनांनी,भाविकांनी उपस्थित राहुन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.