धामणी(ता.आंबेगाव) गावातील विविध विकास कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न!!

धामणी(ता.आंबेगाव) गावातील विविध विकास कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न!!
पुणे म्हाडाचे अध्यक्ष, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतून श्री शिवाजी विद्यालय येथे डांबरी रस्ता करणे 10 लक्ष रुपये,गाढवेमळा जानाई मंदिराकडे जाणार रस्ता ६ लक्ष रुपये तसेच ना. आमदार दिलीपरावजी वळसे पाटील (मा.गृहमंत्री ) यांच्या फंडातून सिमेंट कॉंक्रिट रस्ता ५ लक्ष रुपये या धामणी गावातील विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ मा.पूर्वाताई वळसे पाटील (संचालिका एन.सी.आर.डी) यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना पूर्वा वळसे म्हणाल्या,धामणी आणि परिसरामध्ये विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही नामदार वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्या माध्यमातून सरकारकडून जेवढा लागेल तेवढा निधी आपण मंजूर करून घेऊ.तसेच शिवाजी विद्यालयासाठी लागणाऱ्या सगळ्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे ही त्या म्हणाल्या.
या प्रसंगी श्री.अरुण गिरे (मा. उपअध्यक्ष जि.प.पुणे ) , डॉ.सुभाष पोकळे (मा.प.स. सदस्य ) , डॉ. अशोकराव पगारिया (अध्यक्ष स्कूल कमिटी) ,नेताजी गंधारे (वरिष्ठ अधिकारी पारगाव पोलीस स्टेशन),रवींद्र करंजखेले (पंचायत समिती सदस्य),सुनील बाणखेले (मा. सरपंच मंचर),शिवाजी राजगुरू (उपाध्यक्ष लहुजी वस्ताद समिती) ,रेश्मा बोऱ्हाडे( सरपंच) मा. सरपंच सागर जाधव,उपसरपंच अक्षय विधाटे , ज्ञानेश्वर विधाटे (स्कूल कमिटी सदस्य) , सुप्रिया तांबे (सरपंच शिरदाळे) ,शांतारामशेठ जाधव (उद्योजक) ,अण्णासाहेब बोऱ्हाडे (उद्योजक) , वसंतराव जाधव (सचिव भीमाशंकर शिक्षण संस्था) , रामदास जाधव (स्कूल कमिटी सदस्य ) ,बाळशीराम वाळुंज (गटप्रमुख ) , अनिल शेठ डोके (मा. सरपंच खडकवाडी ) , दिपकराव जाधव (व्हा. चेअरमण ) ,ग्रामपंचायत सदस्य सुरेखा रोडे , जयश्री विधाटे , शालन पंचरास , संतोष करंजखेले , प्रतीक जाधव , दत्ता गवंडी ,संकेत वायकर , जगनराव लंके , वामनराव जाधव , संदीप बोऱ्हाडे ,मयूर सरडे , बाबाजी बढेकर ,बाळासाहेब विधाटे , दत्तात्रेय जाधव ,बाळासाहेब बोऱ्हाडे ,श्रीकांत विधाटे उपस्थित होते.