आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मंचर-लोणी रस्ता हरवला झाडा-झुडपांच्या गर्दीत!!

मंचर-लोणी रस्ता हरवला झाडा-झुडपांच्या गर्दीत!!

आंबेगाव तालुक्यातील दोन महत्त्वाचे ठिकाणे जोडणारा रस्ता म्हणजे मंचर लोणी रस्ता!! या रस्त्यावर सध्या अनावश्यक झाडा-झुडपांची गर्दी वाढलेली आहे. या झाडांच्या गर्दीत हा रस्ता हरवून गेला आहे.

मंचर होऊन लोणीकडे जात असताना जारकरवाडी गावानजीक रस्त्याच्या दुतर्फा झाडांची गर्दी वाढलेली आहे.ज्यामुळे वळणावर वाहन चालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही.परिणामी त्यामुळे अपघाताची शक्यता वाढलेली आहे.

सध्या आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात गवार, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शेवगा या पिकांची रेलचेल सुरू आहे. उत्पादित झालेला सर्व शेतीमाल शेतकरी विक्रीसाठी मंचर या ठिकाणी नेत असतात. परिणामी मंचर-लोणी रस्त्यावर नेहमीच वर्दळ दिसून येते. याशिवाय शाळा सुरू झाल्याने या मार्गावरून विद्यार्थी देखील प्रवास करीत असतात. या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनावश्यक झाडांची गर्दी वाढत असल्याने आणि रस्त्याला बहुतांश ठिकाणी वळणे व उतार असल्याने समोरून सुसाट येणाऱ्या वाहनाचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता अधिक आहे.या रस्त्यावर असणारी अनावश्यक झाडे झुडपे, संबंध विभागाने त्वरित काढून टाकावेत अशी आग्रही मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.