आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

लाखणगाव(ता.आंबेगाव) येथे महिलांसाठी भरतकाम वर्ग सुरू!!

लाखणगाव(ता.आंबेगाव) येथे महिलांसाठी भरतकाम वर्ग सुरू!!

लाखणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांना मोफत भरतकाम प्रशिक्षण देण्यात येत असून,महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन लाखनगावच्या सरपंच प्राजक्ता रोडे यांनी केले आहे.

यावेळी ३५ महिलांनी नोंदणी केली असून प्रत्यक्षात प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.गावातील महिलांना स्वावलंबी व आर्थिक साक्षर करण्यासाठी सरपंच प्राजक्ता रोडे यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण राबविले जात आहे.

सरपंच प्राजक्ता रोडे यांच्या हस्ते फीत कापून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.वेलकीन इंडिया या संस्थेच्या संस्थापिका मीनल मोढवे, अभिलाषा मोढवे,सागर नवले यांच्या संस्थेमार्फत तसेच ग्रामपंचायत सौजन्याने हे प्रशिक्षण दिले जात आहे.

यावेळी ग्रामसेवक उदाराम लिखार,सरपंच प्राजक्ता रोडे,उपसरपंच दिपाली वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य वंदना पडवळ,सुवर्णा पडवळ,साधना अरगडे,अर्चना दौंड, प्रमोद भागवत,मार्तंड टाव्हरे,दस्तगीर मुजावर आदी मान्यवर व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.