जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे नवागत विद्यार्थ्यांचे अभिनव पद्धतीने स्वागत!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून विद्यार्थांना शालेय गणवेश, बूट, सॉक्स आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक,पंचायत समिती आंबेगाव मा.सभापती रामचंद्र ढोबळे,वडजादेवी नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष काळूराम टाव्हरे, सामाजिक कार्यकर्ते समीर ढोबळे यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय थोरात सर, सहशिक्षिका वैजयंता थोरात,अंगणवाडी ताई लताश्री लबडे, अंगणवाडी सेविका निर्मला पाचपुते, शालेय पोषण आहार स्वयंपाकी गुजाबाई ढोबळे यांनी आगामी शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.





