आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या खंडोबा मंदिरात जय विजयची सहा फुटी संगमरवरी शिल्पे बसवली जाणार !!

आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या खंडोबा मंदिरात जय विजयची सहा फुटी संगमरवरी शिल्पे बसवली जाणार !!
धामणी (ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिराच्या “मल्हार “या महाद्बाराच्या बाहेरील दोन्ही बाजूला दोन जय विजयची संगमरवरी शिल्पांची प्रतिष्ठापना चैत्र पोर्णिमेला (२३ एप्रिल २०२४) करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ व खंडोबा देवस्थानाचे सेवेकरी भगत,तांबे,वाघे,वीर मंडळीनी सांगितले.
या मल्हार महाद्बाराच्या दोन्ही बाजूला जयविजय शिल्पाची प्रतिष्ठापना करण्याची सूचना सखाराम महाराज संस्थान अंमळनेरची पायी दिंडी आळंदीहून अंमळनेरकडे जाताना संस्थानाचे प्रमुख ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांनी ग्रामस्थांना खंडोबा मंदिरात केलेली होती.ग्रामस्थांनी केलेल्या आवाहनानुसार धामणी येथील प्रगतीशील शेतकरी बबनराव अर्जुनराव भुमकर व प्राध्यापक राजाराम बबनराव विधाटे यांनी रुपये १,५०,०००/( रुपये एक लाख पन्नास हजार मात्र)किंमतीच्या दोन आकर्षक संगमरवरी मूर्ती देण्याचे मान्य करुन मंगळवारी राजस्थान येथील प्रख्यात शिल्पकार श्री सोनूजी ब्राम्हणे यांच्या जयपूर येथील मूर्तीच्या कारखाण्यात तयार करण्यासाठी दिल्या असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही शिल्पाची विसार रक्कम शिल्पकाराना यावेळी देण्यात आलेली आहे.श्री.बबनराव भुमकर व श्री राजाराम विधाटे यांचा धामणी ग्रामस्थांच्या वतीने मानाचा फेटा,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी देवस्थानाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,शांताराम भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,ज्ञानेश्वर जाधव वाघे,सिताराम जाधव वाघे,पोपट विठ्ठल विधाटे,अरुण बोर्हाडे,दिनेश जाधव,राजेश भगत,पांडुरंग भगत,राहूल भगत,नामदेव वीर,गणेश पंचरास व ग्रामस्थ उपस्थित होते.