आदर्शगाव गावडेवाडीकरांनी दिला निराधार कुटुंबाला आधार!!

आदर्शगाव गावडेवाडी करांनी दिला निराधार कुटुंबाला आधार!!
शासनाचे घरकुल मिळाले,परंतु प्रत्यक्षात तेवढ्या रकमेत घराचे बांधकाम पूर्ण झाले नाही.घर तर पूर्ण झाले,पण घराला अंगण नाही,ओटा नाही,फरशी नाही.ही बाब या निराधार कुटुंबाने गावकऱ्यांच्या कानावर घातली आणि पाडव्याच्या बैठकीत गावकऱ्यांनी तब्बल ५५ हजार रुपये गोळा करून या निराधार कुटुंबाला मदतीचा हात देऊन इतर गावांकडे आदर्श ठेवला.आदर्श गाव गावडेवाडीकरांचे पंचक्रोशीत यामुळे कौतुक होत आहे.
आदर्श गाव ग्राम गावडेवाडी ता.आंबेगाव येथील पांडुरंग मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त रविवारी आढिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.ह.भ.प.दीनानाथ महाराज शिंदे यांनी पंचाग वाचन केले.यावेळी गावातील रामचंद्र आनंदराव गावडे उर्फ काका गुरुजी यांनी आपल्या गावातील मा.सरपंच शामला ज्ञानेश्वर मंडलिक यांचे घरकुलाचे काम अर्धवट झाल्याचे सांगितले,अपूर्ण पैशामुळे अपूर्ण राहिले असल्याचे सांगितले व मदतीचे आवाहन केले.अवघ्या अर्ध्या तासात तब्बल ५२ हजार रुपये जमा झाले उर्वरित रक्कम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र गावडे,सरपंच विजय गावडे व कांदा बटाट्याचे व्यापारी जगदीश पिंपळे यांनी उर्वरित रक्कम घालून पंचावन्न हजार रुपये पूर्ण केले.ही रक्कम ज्ञानेश्वर मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी मंडलिक यांना पूर्ण पोशाख व मा.सरपंच शामलाताई मंडलिक यांना साडी चोळी देऊन जमा झालेली रक्कम सुपूर्द केली.यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मा. उपाध्यक्ष माऊली गावडे ,सरपंच विजय गावडे, मा. सरपंच देवराम गावडे ,उपसरपंच राजेंद्र गावडे, मा. सरपंच किरण गावडे, सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र गावडे ,ऋषिकेश गावडे ,शिवाजी गावडे, माजी सरपंच संतोष गावडे, दीपक नरेंद्र गावडे ,प्रयोगशील शेतकरी कैलास गावडे ,प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर गावडे आदी मान्यवर हजर होते.
आदर्श गाव गावडेवाडीकरांनी ज्ञानेश्वर भाऊराव मंडलिक माजी सरपंच शामलाताई मंडलिक या निराधार कुटुंबाला आर्थिक मदत करून आदर्श जोपासला