शिंगवे (ता.आंबेगाव) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवेच्या मुलींचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम!!

शिंगवे शाळेचा मुलींचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम!!
पाचवी स्कॉलरशीप परीक्षेतील उत्तुंग यशानंतर कला क्रीडेची यशस्वी परंपरा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेच्या मुलींच्या कबड्डी संघाने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत आज पेठ येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
त्याचबरोबर दिक्षा पाबळे लांब उडी द्वितीय क्रमांक,कविता बर्डे 50 मी धावणे द्वितीय या विद्यार्थ्यांनी वैयक्तीक क्रीडा प्रकारात यश मिळवले.
यशस्वी संघ व विद्यार्थ्यांना जालिंदर पोंदे,नवनाथ शिनलकर,राजेंद्र बोंबे,धनंजय पवार,सुषमा कदम,संगिता शिंदे,स्वाती सोनवणे,योगिता बुट्टे,शोभा वेलकर यांनी मार्गदर्शन केले.
विजयी संघाचे भिमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ,उपसरपंच संतोष वाव्हळ,पोलीस पाटील गणेश पंडीत, भैरवनाथ पतसंस्था संचालक हनुमंत तागड,अध्यक्ष वैजनाथ येंधे,उपाध्यक्ष आशा तागड,ग्रा.पं.सदस्य हिरामनशेठ गोरडे,नविनाताई गाढवे,नवीन सोनवणे,सोसायटी संचालक दत्ताञय गोरडे,मा.चेअरमन सुनील पाबळे,मुख्याध्यापक सुरेश लोहकरे, ग्रामपंचायत,सोसायटी,शाळा व्यवस्थापन समिती व क्रीडाप्रेमी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आदर्श फाउंडेशन ग्रुप शिंगवे यांनी शुभेच्छा दिल्या .