आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

आणि…. गव्हाणी घुबडाची पिल्ले आईच्या कुशीत विसावली!!ECO RESQ Team ची यशस्वी कामगीरी!! ची

धान्यलक्ष्मी चे वाहन असणाऱ्या , गव्हाणी घुबडाच्या पिल्लांची आई सोबत यशस्वी पुनर भेट!!

घुबड या पक्षाला अतिशय अशुभ समजले जाते. पौराणिक कथे पासून ते देवीदेवता पर्यन्त या पक्षाचा उल्लेख आपण ऐकला असेल. पूर्वी पासून पिढ्या न पिढ्या आपण सगळे जण हेच ऐकत आलो आहोत की घुबड दिसले की अशुभ असते. अनेक अंधश्रद्धा या पक्षा बद्दल असल्यामुळे सामान्य माणूस घुबड दिसले की हाकलून देतात किंवा मारतात. खर बघायला गेलं तर घुबड हा अतिशय सुंदर आणि छान पक्षी आहे. हा निशाचर पक्षी असून धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांची आणि घुशींची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे मोलाचे काम हा पक्षी करत असतो.
लक्ष्मी चे वाहन म्हणून पण या पक्षाची ओळख आहे.
दौंड मधील समता नगर येथून ECO RESQ हेल्पलाईन नंबर वर फोन आला. बिल्डिंगच्या डक्टमध्ये दोन घुबडाची पिल्ल अडकलेली आहेत. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो आणि परिसराची पाहणी केली एका बिल्डिंग चे काम सुरू होते आणि पहिल्या मजल्यावर लोक राहतात आणि दुसऱ्या मजल्यावर कुणीही राहत नव्हत. तेथील फ्लॅटच्या स्वयंपाकघराच्या माळ्यावर घुबडाचे घरटे होते. घरट्यामध्ये चार पिल्ल असावी. त्यातील दोन पिल्ल डक्ट मध्ये पडली असावी असा आम्ही अंदाज लावला. गेल्या दोन दिवसापासून पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना त्यांचा खूप जास्त ओरडण्याचा आवाज आल्याने रहिवासी असलेल्या भारती मेवाणी यांना पिल्ल डक्टमध्ये पडल्याची शंका वाटू लागली म्हणून त्यांनी पाहणी केली पण काही लक्षात येत नव्हते. ECO RESQ टीम घटना स्थळी पोहचली व गव्हाणी घुबडाची दोन पिल्ले घरट्यातून खाली पडून इमारतीच्या डक्ट मध्ये दोऱ्यात अडकून बसले होते. आम्ही तात्काळ त्यांची सुटका करून पुन्हा त्याला किचनच्या माळावर इतर दोन पिल्लांसोबत एकत्र करून ठेवले. परंतु डक्ट मध्ये पडलेली पिल्लं त्या दोन पिल्लांपेक्षा थोडी लहान वाटत होते त्यामुळे ती पिल्ले त्याच मादीचे आहेत का हे समजण्यासाठी आम्ही त्यांना कॅमेऱ्याचे परिघामध्ये ठेवले. तो कॅमेरा मोबाईल ला कनेक्ट केला. दुसऱ्या दिवशी त्याचे चित्रीकरण पाहिल्यावर ती पिल्ले त्याच मादीची असल्याच समजलं. रात्री मादीने उंदीर आणून त्या चारही पिल्लांना भरविले. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. ECO RESQ टीम चे श्री. नचिकेत अवधानी यांनी जवळ राहणार्या लोकांना या पक्षा विषयी माहिती दिली व या पक्षाच महत्त्व पटून दिलं. 2021 मध्ये आम्ही अशाच एका घुबडाच्या पिल्लांची आई सोबत पुनर भेट घालून दिली होती आणि ह्यावेळी पुन्हा एकदा पुनर्भेट घडविण्यात यश आले.
विविध जंगली प्राणी पक्षी मनुष्यवस्तीमध्ये येण्याच्या घटना वाढत आहेत. या गोष्टीची आपल्याला सवय करून घ्यावीच लागेल कारण बेसुमार वृक्षतोड आणि वाढतं इमारतींचे जाळे शहरीकरण त्यामुळे त्यांचे आदिवास नष्ट झाल्यामुळे राहण्याच्या आणि खाद्याच्या शोधार्थ ते मनुष्य वस्ती जवळ येण्याचे प्रमाण वाढत आहे. आपण या पशु पक्षांना सोबत घेऊन सहजीवन शिकणे खूप महत्त्वाचे झाले आहे.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.