आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

महिला अस्मिता भवन मंचर (ता.आंबेगाव) येथे कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी यांचे ठिय्या आंदोलन!!

अंगणवाडीताईंचे मंचरला येथे ठिय्या आंदोलन!!

महिला अस्मिता भवन मंचर (ता.आंबेगाव) येथे कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी यांचे ठिय्या आंदोलन!!

अंगणवाडीताईंचे मंचरला येथे ठिय्या आंदोलन!!

आदिवासी भागात पोषण आहाराअभावी चिमुरड्यांचे प्रचंड हाल!!

प्रतिनिधी -समीर गोरडे

बेमुदत संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तात्काळ सेवेत रुजू व्हावे; अन्यथा त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची नेमणूक करण्याचे आदेश बाल विकास प्रकल्प कार्यालयाने काढले आहेत. या निर्णयामुळे संतापलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवार (दि. ८) पासून महिला अस्मिता भवन मंचर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. परिणामी पोषण आहाराअभावी चिमुकल्यांचे हाल होत आहेत.

या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष निलेश दातखिळे,पुणे जिल्हाच्या अध्यक्ष सविंदरताई बोराडे ,जिल्हाच्या कार्याध्यक्ष शारदाताई शिंदे,झुंबरताई लोंढे,सुनिता घोलप, विजय थोरात, विमल ढमाले,आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

पाच हजारांत कसा करायचा उदरनिर्वाह ?

शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चा लाखाच्या आणि आम्हाला वेतन पाच हजार, या तुटपुंज्या वेतना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा उद्विग्न सवाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत. त्यामुळे तीन ते सहा वयोगटातील मुलांना पोषण आहार व शिक्षण मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपामुळे ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रातील लाभार्थीना योजनेचे फायदे मिळणे बंद झाले. संपामुळे गर्भवती महिलांना आवश्यक पोषक आहार मिळणे बंद झाले आहे. या संपाचा सर्वसामान्य गरीब आदिवासी कुटुंबाच्या जीवनमानावर परिणाम झाला असून भविष्यात आदिवासी पाड्यातील कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.