दक्षिण आशियाई थाई बॉक्सिंग किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या क्षितिज सापुतेला सुवर्णपदक प्राप्त!!

दक्षिण आशियाई थाई बॉक्सिंग किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या क्षितिज सापुतेला सुवर्णपदक प्राप्त!!
नाशिक- दक्षिण आशियाई थाई बॉक्सिंग/किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धा दि.२७ ते २९ डिसेंबर दरम्यान नेपाळमधील काठमांडू या निसर्गरम्य ऐतिहासिक शहरात पार पडल्या . या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि भारत यासह सहा राष्ट्रे विविध वयोगट आणि वजन श्रेणींमध्ये किकबॉक्सिंग कौशल्य दाखवण्यासाठी हजारो स्पर्धक सहभाग झाले होते.यात नाशिकच्या शिंदे गावातील क्षितिज सापुते याने ९० किलो वजनी गटात सहभाग घेत उत्कृष्ट खेळत सुवर्णपदक प्राप्त केले. त्याची निवड नाशिक डिस्ट्रिक्ट किकबॉक्सिंग असोसिएशन (NDKBA) च्या वतीने करण्यात आली होती.त्याला प्रशिक्षण नाशिक जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन (NDKBA)अध्यक्ष संतोष देशमुख यांनी तसेच अनिकेत भवर,सनी सिंग,उमेश थोरे,संकेत चंद्रमोरे आदींनी परिश्रम घेतले. याबद्दल क्षितिजचे सर्वत्र कौतुक होता आहे. त्याचे अभिनंदन सिन्नर नगरपंचायतचे मुख्यधिकारी रितेश बैरागी, माजी. नगरसेवक दिनकर पाटील,उदय सांगळे, कन्हैयालाल आलठक्कर, शिंदे ग्रामपंचायत सरपंच गोरख जाधव, रामदास तुंगार, संदीप सोनवणे, प्रकाश तुंगार , राहुल तुंगार, सोपान जाधव, अमोल जाधव , तुषार जाधव,सौरभ लभडे, प्रमोद आंबरे, सचिन बिडवे आदींनी त्याला शुभेच्छा दिल्या.