आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील धामणीकरांची ग्रामदेवता बोल्हाईच्या मंदिराचा लोकवर्गणीतून जिर्णोध्दार!!

धामणीकरांची ग्रामदेवता बोल्हाईच्या मंदिराचा लोकवर्गणीतून जिर्णोध्दार!!

मंचर : धामणी (ता.आंबेगांव)येथील बोल्हाईच्या माळावरील पुरातन ग्रामदेवता बोल्हाईच्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्याची सूचना सखाराम महाराज संस्थान अंमळनेर (जि.जळगाव)चे प्रमुख ह.भ.प.प्रसाद महाराज अंमळनेरकर (गोविंदबुवा) यांनी धामणी ग्रामस्थांना मागील वर्षी केलेली होती. त्यांच्या सूचनेनुसार ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बोल्हाई मंदिराच्या जिर्णोध्दार करण्याचा ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येऊन मागील वर्षी जिर्णोध्दाराच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पावसाच्या अभावी तिव्र पाणी टंचाईमुळे काम तूर्तास थांबवलेले होते. मध्यंतरी धामणी, खडकवाडी,लोणी परिसरात झालेल्या पाऊसानंतर जिर्णोध्दाराचे कामाला पुन्हा सुरुवात करण्यात येऊन मंदिरावर आरसीसी स्लँब टाकण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे ग्रामस्थ व सेवकरी मंडळीनी सांगितले.

बोल्हाई मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली असून जिर्णोध्दाराचे उर्वरीत कामात बोल्हाई मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करणे,मंदिराच्या गाभार्‍यात मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी ग्रँनाईटचे सिंहासन करणे, मंदिरासमोर सभामंडप तयार करणे याशिवाय सभोवताली फरशीचे आणि ओट्याचे बांधकाम करणे,मंदिराचे व शिखराचे व मंदिराचे आकर्षक रंगकाम करणे,मंदिराच्या बाहेरील सभामंडपात बोल्हाईचे वाहन संगमरवरी सिंहाचे शिल्प व कासवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे.ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन मंदिरात वज्रलेप करण्यात आलेल्या बोल्हाईच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व शिखरावरील कलशारोहन फाल्गुन कृष्ण पक्ष द्बितीया (बुधवार) दिंनाक २७ मार्च २०२४रोजी करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी व सेवेकर्‍यांनी सांगितले.

धामणी गावांच्या शिवेवर रस्त्याच्या डाव्या बाजूला शिववरची लक्ष्मी आई(मरीआई)तर उजव्या बाजूला बोल्हाईच्या माळावर ग्रामदेवता बोल्हाईचे मंदिर आहे तर या दोन्ही बोल्हाई व मरीआई मंदिराच्या मधोमध कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाचे मंदिर आहे बोल्हाईच्या या मंदिराबाबत जुन्या काळात घडलेली सत्य घटनेची नोंद क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या समग्र ग्रंथात जेष्ठ लेखक कै.विनायक केशव फडके तथा वि.के.फडके यांनी केलेली असल्याचे सांगण्यात येते साधारण दिडशे दोनशे वर्षापूर्वी भारतात इंग्रजाची राजवट होती. या राजवटीच्या विरोधात सन १८५७मध्ये इंग्रजाच्या विरोधात अनेकदा उठाव आंदोलने झाली तरीही इंग्रजाची सत्ता आपल्या देशातून हद्दपार होत नव्हती.त्यानंतर साधारण दिनाक २३ आँक्टोबर १८७८मध्ये क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी अठरापगड जातीधर्माच्या शेतकरी,कामकरी,हरिजन राष्ट्राभिमानी तरण्याबांड धाडशी तरुणांना एकत्रित करुन सशस्र क्रांती संघटना स्थापन केली.गुरुवर्य लहूजी वस्ताद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र सैनिकांना तरबेज करण्यात येत होते या सशस्र लढ्यासाठी पैशाची मोठी कमतरता भासत होती त्यावेळी वासुदेव फडके यांच्या सशस्र दलाने ब्रिटीशधार्जिण्या सावकारांच्या घरावर दरोडे टाकण्याचा इरादा केला २३ फेब्रुवारी१८७९वार रविवार या दिवशी धामारी ( तालुका शिरुर) येथील गावाला संपूर्ण चोहोबाजूने तटबंदी होती गावात येण्यासाठी व जाण्यासाठी एकच मोठे प्रवेशद्बार होते यावेळी धामारी गावाचे वेशीचे तत्कालीन रखवालदार रावजी नाईक यांना वासुदेव फडके यांच्यासमोर पकडून आणण्यात येऊन धामारी गावातील ब्रिटीशधार्जिण्या सावकारांचे घर दाखवण्यास सांगून त्यांची लूट करण्यात आली वासुदेव फडके सशस्र सेनेचा स्वातंत्र्यासाठी घातलेला पहिला दरोडा होता त्यांची इतिहासात नोंद असल्याचे सांगण्यात येते धामारी (ता. शिरुर) येथील समस्त ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्बाराला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके प्रवेशद्बार असे नामकरण करुन क्रांतीवीर वासुदेव फडके यांचा यथोचित सन्मान केला असल्याचे आपल्याला या धामारी गावावरुन जातायेताना दिसते त्यानंतर त्याच रात्री वासुदेव फडके यांचे सशस्त्र दल पाबळ लोणी गावातील सावकाराच्या घरावर दरोडे टाकून साधारण मध्यरात्रीच्या सुमारास धामणीच्या बोल्हाईच्या माळावर आले धामणी गावाच्या चोहोबाजूनी गर्द दाट झाडी यामुळे पुढे घनदाट जंगल असल्याने तिकडे गाव व वस्ती नसल्याने हे सशस्र दल बोल्हाईच्या माळावरच विश्रातीसाठी थांबले व येथील बोल्हाई माळावरच झोपले पहाटे जात्यावर दळण करणार्‍या माताभगिनीच्या ओव्या व पुरातन श्री राम मंदिरातील तत्कालीन पुजारी वै वासुदेव महाराज क्षिरसागर यांच्या वेदशास्र वेदाच्या पठणाचा आवाज सशस्र सेनेला ऐकून खडबडून जाग आलीत्यावेळी येथे गाव असल्याचे समजले.पहाटे उजाडण्यापूर्वीच वासुदेव बळवंत फडके यांचे सशस्र बंड माघारी गेले.त्याकाळी वासुदेव फडके यांचे बंड केवळ कुलस्वामी खंडोबाच्या व त्यांच्या भगिनी बोल्हाई व मरीआईमुळे टळले त्यांच्या दैवी अंशामुळे या सशस्र सेनेला पुढील काही दिसेनासे झाले अशी संपूर्ण गावात श्रध्दा निर्माण झालेली होती तेव्हापासून गावाच्या रक्षण करणार्‍या बोल्हाई व शिववरची लक्ष्मी आईचा सन्मान गांवकरी करतात अशी आख्यायिकेची नोंद असल्याचे सांगण्यात येते आजच्या युगात ईश्वरप्राप्तीसाठी ध्यानधारणा किंवा अन्य काही तप करणे कठीण झालेले आहे अशावेळी नामस्मरण व पुरातन कुलदैवत व कुलदैवताच्या जिर्णोध्दारासाठी सहभागी होणे या मार्गानीच ईश्वराची उपासना करुन त्याची प्रसन्नता प्राप्त करुन घेणे शक्य आहे आणि यामध्ये सहभाग ठेवल्यास ते निश्चितपणे घडून येते व साधकाला ऐहीक आणि पारमार्थिक असे दोन्ही प्रकारचे लाभ होतात असे ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे यांनी सांगितले ग्रामस्थांच्या आणि सर्वाच्या सहकार्याने लोकवर्गणीतून ग्रामदेवता बोल्हाईच्या जिर्णोध्दाराचे काम पूर्ण करायचे आहे तरी या बोल्हाई मंदिराचे जिर्णोध्दारासाठी स्वेच्छेने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत सांगण्यात आले यावेळी नितीनराव गवंडी, मा.सरपंच सागर जाधव, सदस्य अक्षय विधाटे सेवेकरी दादाभाऊ भगत,शांताराम भगत,पांडुरंग आळेकर,राजेश भगत,मिलींद शेळके,प्रमोद देखणे,सुभाष तांबे,शामराव करंजखेले,अजित बोर्‍हाडे,रमेश जाधव,बाळासाहेब सोनवणे,बाबुराव सोनवणे,निलेश करंजखेले,महिपतराव बढेकर,विठ्ठल बढेकर,गणेश पंचरास,निलेश रोडे,दत्ता गवंडी,श्रीकांत विधाटे,बाळासाहेब लालजी बढेकर,मच्छिंद्र आमाप,शांताराम बाळासाहेब जाधव,दत्ता जयवंत जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.