आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची प्रेरणा आपल्याला आजही मिळते. शिवरायांना त्यांनी बालपणापासून दिलेले संस्कारचे धडे, देव, देश,धर्म यांचा अभिमान, युद्ध नितीचे धडे, गनिमी काव्याचे शिक्षण, स्रीयांविषयी आदर,शेतकरी धोरण यांचे संस्कार केले.ज्यामुळे भारत भूमीला छत्रपती शिवाजी महारांजा सारखा जाणता राजा लाभला असे वक्तव्य या प्रसंगी लोणी गावचे सरपंच सावळेराम नाईक यांनी केले.

आई आणि मुलाचे नाते कसे असावे हे ही आपण जिजाऊ आणि शिवरायांकडून शिकतो. कठीण प्रसंग आला तरी त्याला सामोरं जाण्याचे बळ कसे विकसित करावे हे जिजाऊंनी वेळोवेळी शिवरायांना शिकवले. त्यांच्या संगोपनात त्यांनी मजबूत केलेला शिवरायांचा आत्मविश्वास, घडवलेले व्यक्तिमत्त्व यामुळे आज 350 वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजां विषयीचे कुतूहल, त्यांच्याबद्दलचा आदर, प्रेम आजही आपल्या समाजात टिकून आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी लोणी गावचे लोकनियुक्त सरपंच सावळेराम नाईक, मा.सरपंच उध्दव लंके,मा.सरपंच दिलीप वाळुंज, बाळासाहेब आदक, बबन वाळुंज, हैबत आढाव व शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.