रूडसेट संस्था येथे १० दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण संपन्न!!

रूडसेट संस्था येथे १० दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण संपन्न!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
तळेगाव दाभाडे , मावळ येथे आयोजित केलेल्या शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षणासाठी डॉ.श्री प्रशांत भड, उपआयुक्त, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे यांनी सदिच्छा भेट देऊन शेळीपालनच्या प्रशिक्षणार्थ्यांना पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध शेळीपालन संदर्भाततील कर्ज योजना अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षणार्थीच्या समोर मांडल्या. आणि जोपर्यंत ग्रामीण भागातील व्यक्ती शेतीपूरक व्यवसायाकडे वळणार नाही तोपर्यंत देशातील बेरोजगारी कमी होणार नाही आणि उत्पन्नाचे साधनेही वाढणार नाहीत म्हणून तुम्ही शेळी पालन सारख्या व्यवसाय करून स्वतःचे अर्थाजन करण्यासाठी पुढे आलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन तुम्ही असाच व्यवसाय पुढे चालू ठेवा आणि तुमच्या पिढीलाही या व्यवसायात उतरवा असा सल्लाही डॉ.प्रशांत भड यांनी दिला.
कार्यक्रमाप्रसंगी शेळीपालन प्रशिक्षक ऋषीकुमार फुले व तसेच व्यवस्थापकीय स्टाफ ही उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश बावचे यांनी केले तर सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने आभार दिनेश निळकंठ यांनी मांडले.