आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर शाखेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!!

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर शाखेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!!

शहापूर तालुक्यातील मोहिली- अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, (कोकमठाण) संचलित. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने ,समस्त संत परिवाराच्या प्रेरणेतून, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब, समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने संकुलातील शैक्षणिक व क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन आत्मा मालिक मेडिटेशन हॉल येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

यावेळी संत भारत माता,संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब , स्थानिक विश्वस्त अनंत गायकवाड, प्रवीण मोरे, शैक्षणिक संचालक डॉ. डी. डी. शिंदे सर,जनरल व्यवस्थापक श्री गुलाब हिरे, प्रा.उल्हास पाटील,
आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य गोविंद चव्हाण,आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्राचार्य कैलास थोरात,पंकज बडगुजर, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अनिल पाटील यांच्यासह संकुलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या परिपत्रकानुसार सामूहिक योगाभ्यासामध्ये योगा प्रशिक्षक पुरुषोत्तम पानबुडे यांनी योगा प्रात्यक्षिके सादर करत योगिक सूक्ष्म व्यायाम, योगासने, प्राणायाम,ध्यानअभ्यास, सूर्यनमस्कार उपस्थितांनी, प्राध्यापक शिक्षक, विद्यार्थीनी सादर केले तसेच सी.बी.एस.ईच्या विद्यार्थ्यांनी योगाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत.

संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांनी तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग मनुष्य आयुष्यात समतोल राखण्यासाठी तंत्र म्हणजे योगा आहे.तसेच अध्यात्मिक शांती, एकाग्रता साधण्यासाठी ध्यानाचे माध्यम म्हणजे योगा तसेच विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

तसेच योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य घेण्यात आल्या यावेळी विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थीना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन साबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीत विभाग प्रमुख स्वरांजली ग्रुपने संगीत सेवा दिली.संकुलाचे क्रीडा शिक्षक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विभाग प्रमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.