आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस भारत राखीव बटालियन येथे उत्साहात साजरा!!

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस भारत राखीव बटालियन येथे उत्साहात साजरा!!

कोल्हापूर प्रतिनिधी- कोल्हापूर येथील भा.रा.ब. 3 कॅम्प वाडीतील (ता.करवीर) येथे आंतरराष्ट्रीय योग दीन साजरा करण्यात आला. पोलीस अधिकारी, अंमलदार व आर्ट ऑफ लिविंग संस्थेचे योग प्रशिक्षक यांनी योगासनांचा सराव केला.
समादेशक श्रीमती नम्रता पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आर्ट ऑफ लिविंग संस्थेचे प्रशिक्षक पद्मजीत जाधव व सुमेध पोरे यांनी योगाभ्यास व योगाचे महत्त्व पटवून देत पूरक हालचाली, अनुलोम विलोम, प्राणायाम, कपाल भारती, भ्रमरी, ताडासन, वज्रासन, बकास, त्रिकोणासन, श्वासन, अशी विविध असणे घेतली व कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी, पूरक आहार विहार याविषयी सहाय्यक समादेशक सदानंद सदाशिव यांनी माहिती सांगितली.

सदरचा कार्यक्रम सहायक समादेशक गोविंद हिंगरूपे, सहाय्यक समादेशक सदानंद सदाशिव यांच्या उपस्थितीत पार पडला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्वाबाबत सहाय्यक समादेशक श्री. सदाशिव यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन पो. नि. अरविंद गीते यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.