आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

श्री.संतोष जयसिंग मोरे हे हिंदुजा मधून सेवानिवृत्त!!

श्री.संतोष जयसिंग मोरे हे हिंदुजा मधून सेवानिवृत्त!!

शिवतर,तालुका खेड,जिल्हा रत्नागिरीचे सुपुत्र,सैन्य दलात 17 वर्षे नोकरी केल्यावर ते हिंदुजा हॉस्पिटल येथे नोकरीस लागले.तेथे 23 वर्षे नोकरी करून दिनांक 07/08/2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

श्री संतोष मोरे यांनी सैन्य दलात 17 वर्षे नोकरी दरम्यान भोपाळ,झाशी,अरुणाचल बर्फात, NSG-ब्लॅक कॅट,पठाणकोट,सिकंदराबाद अशा अनेक ठिकाणी खडतर नोकरी करून निवृत्त झाल्यावर ,माहीम येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे 23 वर्षे इमानेइतबारे नोकरी केली,तेथे येणाऱ्या ओळखीच्या लोकांना ते सातत्याने,आवर्जून मदत करीत असत.हिंदुजा हॉस्पिटल मधून ते बुधवार,दि 7/08/24 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत.

त्यांना समाजकार्याची आवड असून वाडीतील हनुमान मंदिरातील मंडळात ते सक्रिय पदाधिकारी असून सर्व कार्यक्रमात ते आवर्जून पुढे असतात.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.