अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कलाविष्कार चित्र व शिल्प प्रदर्शन यांचे आयोजन!!

अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कलाविष्कार चित्र व शिल्प प्रदर्शन यांचे आयोजन!!
उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रथमच आयोजन!!
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील शिक्षण प्रसारक मंडळीचे विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अवसरी बुद्रुक या विद्यालयात उत्तर पुणे विभागामध्ये ग्रामीण भागात प्रथमच दि. 25 जाने पासून कलाविष्कार चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे आयोजन आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. दत्ता ठुबे सर यांचे शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. विष्णू काका हिंगे पाटील कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुनी भास्कर हांडे सर ( वैश्विक आर्ट गॅलरी, नेदरलँड् ) सिटीस्केप आर्टीस्ट श्री. गणेश पोखरकर. श्री. किरण सरोदे (उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघ) श्री. मिलिंद शेलार ( अध्यक्ष- पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ ) श्री. भानुदास बोऱ्हाडे (अध्यक्ष – आंबेगाव तालुका कलाशिक्षक संघ ) उपस्थित होते.
या प्रसंगी युवा नेते श्री.विवेक दादा वळसे पाटील. श्री.वाघ साहेब, (नायब तहसीलदार घोडेगाव, ) श्री.श्रावण जाधव सर ( अध्यक्ष- पुणे जिल्हा कलाध्यापक संघ) मंचर पोलिस स्टेशनचे अधिकारी डावखर सर, शिंदे सर यांनी सदिच्छा भेटी देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आणि विविध माध्यमातून चित्रे साकारली आहेत.कलाशिक्षक श्री.संतोष चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आणि विविध माध्यमातून साकारलेल्या 250 चित्र व शिल्प कलाकृतींचा कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
यात प्रामुख्याने निसर्ग चित्रे,व्यक्ती चित्रे, वस्तू चित्रे याबरोबरच सामाजिक विषयांवरील चित्रे तसेच अमूर्त व आधुनिक शैलीची चित्रे जलरंग, पोस्टर रंग, ॲक्रॅलिक, ऑईल पेस्टल, क्रेऑन यां सोबतच तैलचित्र देखील साकारली आहेत.
कोरोना नंतर शाळा नियमीत सुरू झाल्या.परंतु मुलांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत पठारावस्था आलेली आहे. मुलांना यातुन बाहेर काढून शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मुलांना रंगांच्या सानिध्यात आणून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विद्यालयाने ग्रामीण भागात अशा प्रकारचा अतिशय स्तुत्य आणि यशस्वी उपक्रम राबविला आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात कायमच अग्रेसर असते. पुस्तकी ज्ञानासह दैनंदिन आयुष्यात एक उत्तम माणूस बनण्यासाठी शाळेत संस्काराचे धडे दिले जातात.
यासाठी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.विष्णू काका हिंगे,उपाध्यक्ष श्री.योगेश चव्हाण, उपसचिव श्री. दिपक चवरे, संचालक श्री.अजित वाडेकर, शिवशंभो प्रतिष्ठान अवसरी बुद्रुक यांचे विशेष सौजन्य आणि ग्रामपंचायत अवसरी यांचे विशेष योगदान लाभले.
यावेळी तालुक्यांतील विवीध शाळांतीळ शालेय विध्यार्थी यांनी या प्रदर्शनास भेटी दिल्या.