आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये समर्थ फार्मसी व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी!!

महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये समर्थ फार्मसी व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी!!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटी मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये समर्थ संकुलातील फार्मसी व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान व नेत्रदिपक कामगिरी केल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव-कल्पनांना तसेच प्रकल्पांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना व प्रकल्पांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.त्या अनुषंगाने समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे या पदवी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या दिक्षिता डेंगणे व सुहानी भगत यांनी सादर केलेल्या “च्युएबल गमीज: ए डिफरंट एप्रोच टू इंक्रीज पेशंट्स कम्पलायन्स” या प्रकल्पाने तालुका स्तरावरील स्पर्धकांमध्ये जुन्नर तालुक्यातून अव्वल स्थान पटकावल्याची माहिती समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की यांनी दिली.या विद्यार्थ्यांना समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे डॉ.कुलदीप वैद्य यांनी मार्गदर्शन केले.

तसेच समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग या विभागातील प्रतिक्षा फापाळे,सुमित दांगट व सानिका बोडके यांनी सादर केलेल्या “सोलार बेस्ड क्रॉप रूफिंग सिस्टीम अँड वॉटर मॅनेजमेंट युजिंग आय ओ टी” या प्रकल्पाला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्याची माहिती अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी यांनी दिली.
या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,प्रा.प्रियांका लोखंडे,प्रा.दिपाली गडगे यांनी मार्गदर्शन केले.

फार्मसी व अभियांत्रिकीच्या दोन्ही संघातील स्पर्धकांची पुढील जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड झाल्याची माहिती अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी व फार्मसी कॉलेजचे विभागप्रमुख डॉ.कुलदीप वैद्य यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.