आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मुलगी हीच खरी संपत्ती! स्रीभ्रूण हत्या रोखणे हीच खरी काळाची गरज!!

ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे कळमजाई मंदिराच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम झाले संपन्न!!

मुलगी हीच खरी संपत्ती! स्रीभ्रूण हत्या रोखणे हीच खरी काळाची गरज!!

ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे कळमजाई मंदिराच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम झाले संपन्न!!

मुलगी हीच खरी संपत्ती आहे. आपल्याला आई पाहिजे, बहीण पाहिजे,बायको पाहिजे मग मुलगी का नको? स्त्रीभ्रूण हत्या रोखणे हीच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध जादूगार श्री. प्रकाश शिरोळे यांनी केले.

आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे कळमजाई मातेचा मंदीर जीर्णोद्धार तपपूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या माध्यमातुन जादूचे,संमोहन शास्त्राचे प्रयोग सादर केले गेले.

या निमित्ताने मंदिर परीसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी होमहवन व दुर्गापुजा, गोंधळ-भराड, प्रवचन सेवा, महिलांची महाआरती, भजन,महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले.

या सर्व कार्यक्रमांचे नियोजन समस्थ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.