धामणी (ता.आंबेगाव) गावचे नवनियुक्त पोलीस पाटिल श्री. सुरज सुधाकर जाधव यांचा धामणी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार झाला संपन्न!!

धामणी (ता.आंबेगाव) गावचे नवनियुक्त पोलीस पाटिल श्री. सुरज सुधाकर जाधव यांचा धामणी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार झाला संपन्न!!
आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील मोठ्या आणि आदर्श असणाऱ्या धामणी गावचे पोलीस पाटिल पद हे अनेक दिवसांपासून रिक्त होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला अनेक अडचणी येत होत्या. तसेच विद्यार्थी व नागरिकांना शासकीय कामात पोलीस पाटिल नसल्याने अडथळा निर्माण होत होता. परंतु शासनाने पुणे जिल्हातील रिक्त पोलीस पाटलांच्या जागांची मोठी भरती करुन रिक्त जागा भरल्या.त्यामध्ये धामणी गावची पोलिस पाटिल जागा भरण्यात आली.
धामणी गावचे पोलीस पाटिल हे आरक्षीत होते. शासकीय परिक्षा, सर्व निकष, मुलाखती मध्ये श्री. सुरज सुधाकर जाधव हे उत्तीर्ण झाले व त्यांची पोलीस पाटिल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे औचित्य साधुन आज धामणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सत्कार सोहळ्यात दैनिक सामना चे उपसंपादक अॅड विठ्ठलराव जाधव पाटिल यांनी बोलताना सांगितले की सुरज जाधव यांच्या घराला समाजसेवेचा वसा आणि वारसा आहे. सुरज यांचे वडील सुधाकर जाधव हे अनेक वर्षांपासून धामणी पोस्ट मध्ये पोस्टमन म्हणुन चांगले काम करत आहेत.पोलीस पाटिल म्हणुन काम करत असताना ग्रामस्थ सर्व प्रकारे सौजन्य करतील.
सत्काराला उत्तर देताना सुरज जाधव यांनी सांगितले की मी पोलिस पाटिल मानाचे नाही तर कामाचे पद आहे असे समजुन काम करेल. पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मधील दुवा पोलीस पाटिल असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल.
त्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, मा. सरपंच अंकुश भूमकर, मा. सरपंच सुनिलदादा जाधव, पाणलोट चे सचिव सुभाष नेते जाधव, शाखाप्रमुख दिपक जाधव शाखाप्रमुख विशाल बोऱ्हाडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, प्रतिक जाधव, संघटक संतोष पंचरास चेअरमन कोंडिभाऊ तांबे, मा. उपसरपंच मिलिंद शेळके,मा. उपसरपंच दत्तात्रय गवंडी, पोलीस अधिकारी संदिप पवार, मा. उपसरपंच महेश भुमकर, विक्रम बोऱ्हाडे, संचालक सुधाकर जाधव, संचालक दिपक जाधव,मिलिंद जाधव, तान्हाजी रोडे, मच्छिंद्र अमाप, बाळासाहेब जाधव, अमोल जाधव, राहुल जाधव, विकास रोडे, सिलेमान इनामदार,दिलीप बढेकर, किरण जाधव, चिंतामण जाधव,कोतवाल गणपत भंडारकर, सुनिल सासवडे, संजय जाधव, योगेश विधाटे, गोरक्ष हिवरकर, कैलास भुमकर, महंमद तांबोळी, चंकी जाधव दिनेश जाधव, आकाश जाधव, माऊली जाधव, धोंडीभाऊ ससाणे आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सरपंच सागर जाधव यांनी केले.