आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

स्व.ॲड.अविनाशजी रहाणे यांच्या स्मृतींना दिला धामणी ग्रामस्थांनी उजाळा!!

स्व.ॲड.अविनाशजी रहाणे यांच्या स्मृतींना दिला धामणी ग्रामस्थांनी उजाळा!!

शिवसेना सहसंपर्कप्रमुख मा. जिल्हाप्रमुख स्व. अविनाशजी रहाणे साहेब आणि धामणी ग्रामस्थांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. रहाणे साहेबांनी वेळोवेळी धामणीतील कार्यकर्त्यांना ताकद द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी तालुक्याचे नेतृत्व केले. आज धामणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत समोर पंचांच्या पारावर रहाणे साहेबांच्या स्मृतीपित्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला जेष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते स्व.अविनाशजी रहाणे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी बोलताना सांगितले की मी अगदी लहान पासून साहेबांचा सोबत सावलीसारखा राहिलो. तालुक्यांमध्ये साहेबांच्या माध्यमातून मला मोठमोठी पदे भूषवायची संधी मिळाली. आज मी जे काय आहे त्यामध्ये स्व. अविनाश रहणे साहेबांचा मोलाचा व सिंहाचा वाटा आहे.हिंदुऱ्हदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे भेटायला गेले असताना रहाणे साहेबांनी करुन दिलेली ओळख व अनेक प्रसंग त्यांनी सांगितले.
दैनिक सामना चे उपसंपादक विठ्ठलराव जाधव यांनी बोलताना सांगितले की, मी आणि रहाणे साहेब यांनी पत्रकारिता, वकिली सोबत केली. स्व. रहाणे साहेबांसोबत घडलेले अनेक प्रसंगांची त्यांनी आठवण करुन दिली. धामणी गावात युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री लिलाधर डाके, शाबीरभाई शेख, पालकमंत्री प्रमोद नवलकर असे अनेकांना गावामध्ये आणता आले या सर्वांमध्ये मोलाचा वाटा स्व. रहाणे साहेबांचा आहे.
यावेळी सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे, मा. सरपंच अंकुश भूमकर, मा सरपंच सुनिलदादा जाधव,पाणलोट चे सचिव सुभाष नेते जाधव, शाखाप्रमुख विशाल बोऱ्हाडे, संघटक संतोष पंचरास, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, प्रतिक जाधव,उपतालुकाप्रमुख महेश वाघ या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्याप्रसंगी ह. भ. प. संतोष महाराज बढेकर, उपसरपंच संतोष करंजखेले,तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव,चेअरमन कोंडिभाऊ तांबे, पोलीस पाटील सुरज जाधव, मा. उपसरपंच मिलिंद शेळके,मा. उपसरपंच दत्तात्रय गवंडी, पोलीस अधिकारी संदिप पवार, मा. उपसरपंच महेश भुमकर, विक्रम बोऱ्हाडे, संचालक सुधाकर जाधव, संचालक दिपक जाधव,मिलिंद जाधव, तान्हाजी रोडे, मच्छिंद्र अमाप, बाळासाहेब जाधव, अमोल जाधव, राहुल जाधव, विकास रोडे, सिलेमान इनामदार,दिलीप बढेकर, किरण जाधव, चिंतामण जाधव,कोतवाल गणपत भंडारकर, सुनिल सासवडे, संजय जाधव, योगेश विधाटे, गोरक्ष हिवरकर, कैलास भुमकर, महंमद तांबोळी, चंकी जाधव दिनेश जाधव, आकाश जाधव, माऊली जाधव, धोंडीभाऊ जाधव आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सरपंच सागर जाधव तर आभार शाखाप्रमुख दिपक जाधव यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.