आरोग्य व शिक्षण

खडकवाडी (ता.आंबेगाव) गावावर पसरली शोककळा, बेल्हा-जेजुरी महामार्गावर धामारी(ता. शिरूर) जवळ झालेल्या अपघातात माय-लेका सह तरुणाचा मृत्यू.

बेल्हा-जेजुरी महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्या संपताना दिसत नाही. धामारी (ता. शिरूर) येथे रात्री उशिरा दुचाकी – मालवाहतूक टेंपो यांची धडक झाली. यात खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील माय लेकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संकेत दिलीप डोके, विजया दिलीप डोके व ओंकार चंद्रकांत सुक्रे असे मयत झालेल्या तिघांची नावे आहेत.

धामारी ता. शिरुर येथील शिक्रापूर पाबळ दरम्यान बेल्हा जेजुरी महामार्गावरून संकेत डोके हा त्याची आई व एका मित्रासह त्याच्या ताब्यातील एम एच १४ एच आर ७०७३ या दुचाकीहून धामारी बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत असताना शिक्रापूर बाजूने आलेल्या एम एच १४ जि यु ६८८० या टेम्पोची डोके यांच्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला. यात संकेत दिलीप डोके( वय २० वर्षे), विजया दिलीप डोके (वय ४० वर्षे), ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय २० वर्षे) तिघे रा. खडकवाडी ता. आंबेगाव जि. पुणे यांचा जागीच मृत्यू झाला.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.