आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावच्या माता रमाई नगर वस्ती येथे सभामंडप बांधणे या कामासाठी १० लक्ष रुपये निधीची तरतूद

मंजुरीपत्र व आदेश शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांकडे केले सुपूर्त!!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावच्या माता रमाई नगर वस्ती येथे सभामंडप बांधणे या कामासाठी १० लक्ष रुपये निधीची तरतूद!!

मंजुरीपत्र व आदेश शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांकडे केले सुपूर्त!!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्त्यांच्या उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासकामांसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

या योजनेअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावच्या माता रमाई नगर वस्ती येथे सभामंडप बांधणे या कामासाठी १० लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील मंजुरीपत्र व आदेश शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांकडे सुपूर्द केले.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुख संतोष डोके, पंचायत समितीचे मा.सदस्य रविंद्र करंजखेले, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मालतीताई थोरात, ग्राहक संरक्षक कक्षाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव राजगुरू, पिंपळगाव(खडकी) गावचे शिवसेना युवानेते संदीप वाघमारे, सतीश वाघमारे, केतन वाघमारे, प्रविण वाघमारे, मधुकर वाघमारे, गौतम वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.